Lava Yuva 2 : भारतात लॉन्च झाला बजेट स्मार्टफोन! किंमत फक्त 6,999 रुपये, मिळणार 5000mAh बॅटरी आणि 6GB रॅम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lava Yuva 2 : भारतात अनेक कंपन्यांचे नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना ते खरेदी करता येत नाहीत. म्हणून आता देशात एक बजेट स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी 6,999 रुपये आहे.

Lava कंपनीकडून त्यांचा Yuva 2 हा स्मार्टफोन शक्तिशाली बॅटरी आणि 6GB रॅमसह भारतात लॉन्च केला आहे. कंपनीकडून 2 महिन्यांपूर्वी त्यांचा Lava Yuva 2 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे डिझाईन सारखेच आहे.

जर तुम्हीही कमी बजेट स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी Lava Yuva 2 हा स्मार्टफोन सर्वोत्तम पर्याय ठरेल. हा स्मार्टफोन 3GB रॅम, 64GB अंतर्गत स्टोरेजसह ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Lava Yuva 2 हा स्मार्टफोन ग्लास ब्लू, ग्लास लॅव्हेंडर आणि ग्लास ग्रीन या रंग पर्यायासह ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक त्याच्या आवडीनुसार रंग पर्याय निवडून हा स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करू शकतात.

Lava कंपनीच्या Yuva 2 आणि Yuva 2 Pro या स्मार्टफोनच्या किमतीमध्ये फक्त १ हजार रुपयांचा फरक आहे. तसेच दोन्ही स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Lava Yuva 2 तपशील

लावा कंपनीच्या Yuva 2 स्मार्टफोनमध्ये 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा HD+ सिंक डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज

कंपनीकडून ग्राहकांना Yuva 2 हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 64GB UFS 2.2 अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर 512 GB पर्यंतचे स्टोरेज SD कार्डने वाढवू शकतात.

कॅमेरा

Lava Yuva 2 स्मार्टफोनमध्ये रिअरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 13MP प्राथमिक कॅमेरा आणि दुसरा AI कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. तसेच फ्रन्ट 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

बॅटरी

Lava Yuva 2 स्मार्टफोनमध्ये 5000mAh शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी बजेटमध्ये जास्त काळ चार्जिंग टिकणारा स्मार्टफोन उपलब्ध झाला आहे. तसेच हा स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी 10W चार्जर देण्यात येत आहे.