LG Suitcase TV : LG ने आणला लाईटशिवाय चालणारा टीव्ही, सूटकेससारखा कुठेही येईल नेता; जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LG Suitcase TV : सध्या स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपले शानदार फीचर्स पानसरे स्मार्टटीव्ही लाँच करत आहेत. ज्याच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. अशातच आता LG ने देखील आपला एक जबरदस्त टीव्ही आणला आहे.

जो तुम्हाला लाईट नसली तरी चालवता येतो. विशेष म्हणजे हा टीव्ही तुम्हाला सूटकेससारखा कुठेही नेता येईल. जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करणार असाल तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या या टीव्हीची फीचर्स आणि किंमत.

LG चा हा टीव्ही सूटकेस 27-इंचाचा 1080p LCD टीव्ही, बॅटरी तसेच 20-वॅट स्पीकर चेसिसच्या आत बसवल्यामुळे खूप वेगळा वाटत आहे. या टीव्हीमध्ये तीन तासांची बॅटरी आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ज्यामुळे ते लहान सहलींसाठी, पार्टीसाठी किंवा तुमच्या लिव्हिंग रूममध्ये पोर्टेबल मनोरंजन पर्याय म्हणून होऊ शकते. हा टीव्ही त्याच्या अंगभूत हँडलसह सहज पोर्टेबल असल्याने तुम्ही कुठेही जाता त्यावेळी तो तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जाता येतो.

कंपनीने असेही सांगितले आहे की हा टीव्ही मनोरंजनासाठी एक उत्तम पर्याय आहे. उदाहरणार्थ, कॅम्पिंग करत असताना तुम्हाला चित्रपट किंवा टीव्ही शो पाहण्यासाठी याचा वापर करता येईल. किंवा तुम्ही व्यायाम करत असताना त्यावर संगीत लावू शकता.

जरी हा टीव्ही लहान असला तरी, तो डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस सारखी ध्वनी गुणवत्ता ऑफर करेल. तसेच टीव्ही webOS वर चालतो आणि Apple AirPlay, Bluetooth पेअरिंग आणि Wi-Fi ला देखील सपोर्ट करतो.

जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता

किमतीचा विचार केला तर LG StanbyME Go US मध्ये $999 (रु. 83,113) मध्ये उपलब्ध असणार आहे. LG लाँच प्री-ऑर्डरसह विनामूल्य LG XBOOM 360 ब्लूटूथ स्पीकर XO3QBE ऑफर करेल. ज्याची किंमत $299.99 (रु. 24,958) इतकी आहे. तसेच हा टीव्ही भारतासह इतर देशांमध्ये प्रदर्शित होईल की नाही हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नाही.