Loom Solar System:- सध्या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना यासाठी कार्यरत करण्यात आलेले आहेत. या योजनांच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान देखील देण्यात येत आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान सूर्यघर योजनेची घोषणा केली व या योजनेच्या माध्यमातून देखील आता घराच्या छतावर सोलर सिस्टिम बसवता येणार आहे व या माध्यमातून अनुदान देखील मिळणार आहे. जर तुम्हाला देखील तुमच्या घरावर सौर पॅनल सिस्टीम बसवायचे असेल तर वेगवेगळ्या कंपन्यांचे सोलर पॅनल बाजारपेठेमध्ये सध्या उपलब्ध आहेत.
त्यामधून तुम्ही तुमच्या सोयीनुसार 1kW पासून ते 5kW पर्यंतचे सोलर पॅनल बसवू शकतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या सोलर पॅनल कंपन्यांमध्ये लूम सोलर ही देखील एक महत्त्वाची व प्रसिद्ध अशी सोलर पॅनल निर्माण करणारी कंपनी आहे.
सध्या या कंपनीच्या माध्यमातून एक महत्त्वाची बातमी अशी आहे की, या कंपनीने अलीकडच्या कालावधीत 5kWh सोलर पॅनलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट केली असून अधिक लोकांना त्यांच्या सोलर सिस्टमचा फायदा घेता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. याच लूम सोलर पॅनल विषयीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
लूम सोलर पॅनल आहे फायद्याचा
लूम सोलर ही भारतातील एक सोलर पॅनल निर्यात करणारी महत्त्वाची व प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून 5kWh सोलर पॅनलच्या किमतीमध्ये घट करण्यात आलेली आहे. परंतु हा निर्णय घेत असताना मात्र पॅनलचे फीचर्स व वारंटी मध्ये कंपनीने कुठल्याही प्रकारची बदल केलेले नाहीत.
जर आपण लूम सोलर पॅनलचा विचार केला तर घरी बसवण्यासाठी तीन मुख्य घटक यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामध्ये सोलर पॅनल तसेच बॅटरी आणि इन्व्हर्टर या तीन घटकांची आवश्यकता असते व लुम सोलर सिस्टममध्ये हे तीनही घटक आहेत. या सोलर पॅनलची बॅटरी 5kW लिथियम सेलने बनलेली असून ते चांगल्या आऊटपुट देते.
दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा ही सौर पॅनल सिस्टम घरातील सर्व विद्युत उपकरणे व्यवस्थित चालवते व बॅटरी देखील चार्ज करते व रात्र झाल्यानंतर मात्र ऑटोमॅटिक इन्वर्टर चालू होते व घरातील सर्व विद्युत उपकरणे चालतात.
तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेली ही सोलर सिस्टममध्ये कोणतीही समस्या आली तर कंपनी तुम्हाला या सिस्टमवर पाच वर्षाची वॉरंटी देते. म्हणजेच पाच वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या यामध्ये उद्भवली तर कंपनीच्या माध्यमातून सोलर पॅनल सिस्टम बदलून दिली जाते.
लूम सोलर 5kW सोलर पॅनल सिस्टम ची इन्स्टॉलेशनची किंमत किती आहे?
जर आपण लूम सोलरच्या अधिकृत वेबसाईटचा विचार केला तर त्यानुसार ही सोलर सिस्टम बसवण्याची किंमत ही 15000 रुपये प्रति किलोवॉट इतकी असून संपूर्ण सोलर सिस्टम बसवण्याचा खर्च पाहिला तर तो साडेचार लाख रुपये पर्यंत आहे. महत्वाची बाब म्हणजे जेव्हा ही सोलर सिस्टम लॉन्च करण्यात आलेली होती.
तेव्हा तिची किंमत साडेसहा लाख रुपये होती. परंतु ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने लूम सोलरने किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडच्या कालावधीत घट केली व आता ही सोलर पॅनल प्रणाली लॉन्च किमतीपेक्षा तब्बल दोन लाख 25 हजार रुपयांनी स्वस्तात मिळत आहे.
लूम सोलर 5kW वर उपलब्ध आहे सबसिडी आणि सुलभ हप्त्याचा पर्याय
कंपनीच्या माध्यमातून ही सोलर प्रणाली स्वस्तात उपलब्ध करून दिली आहे. परंतु यावर कंपनीच्या माध्यमातून सुलभ हप्त्याचा पर्याय म्हणजेच ईएमआय ऑप्शन देखील उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही मासिक हप्त्यांवर तुमच्या घरी ही सोलर पॅनल सिस्टम बसवू शकतात. याकरिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9646 रुपये इतके पैसे मोजावे लागतील.