Recharge : सध्या देशभरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे, अशातच मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. देशातील टेलिकॉम कंपन्या निवडणुकीच्या निकालानंतर रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
टेलिकॉम कंपन्या त्यांच्या योजना 25 टक्के पर्यंत महाग करू शकतात. गेल्या काही वर्षांतील ही चौथी दरवाढ असेल. योजना महाग करून, कंपन्यांना त्यांचे ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वाढवायचे आहे. एका प्रसिद्ध अहवालात असे सांगितले आहे की, स्पर्धात्मक वातावरणात 5G गुंतवणुकीदरम्यान कंपन्या त्यांच्या नफ्यात सुधारणा करण्यासाठी योजनांच्या किमती सुमारे 25 टक्के वाढवू शकतात.
अहवालात असेही म्हटले आहे की, शुल्क वाढ खूपच जास्त वाढू शकते, परंतु अशी अपेक्षा आहे की कंपन्या शहरी आणि ग्रामीण वापरकर्त्यांना लक्षात घेऊन किंमती वाढवतील. अहवालानुसार, पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही योजना पूर्वीपेक्षा महाग होऊ शकतात. दुसरीकडे, इंटरनेट योजना देखील महाग असू शकतात.
शहरात राहणारे लोक त्यांच्या एकूण खर्चाच्या 3.2 टक्के टेलिकॉमवर खर्च करत होते, ते आता वाढून 3.6 टक्के होईल. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दूरसंचार खर्च 5.2 टक्क्यांवरून 5.9 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्यांनी बेसिक प्लॅनची किंमत 25 टक्क्यांनी वाढवली तर त्यांचा सरासरी रेव्हेन्यू पर युजर (एआरपीयू) 16 टक्क्यांनी वाढेल, असेही या अहवालात म्हटले आहे. म्हणजेच एअरटेलची कमाई प्रत्येक युजरकडून 29 रुपये आणि जिओची कमाई प्रत्येक युजरकडून 26 रुपयांपर्यंत वाढेल.
रिचार्ज प्लॅन किती रुपयाने महागणार?
वर दिल्याप्रमाणे 25 टक्के दरवाढ झाली, तर तुम्ही दर महिन्याला 200 रुपयांचे रिचार्ज केला तर त्यामागे 50 रुपये वाढतील. याचा अर्थ 200 रुपयांचा टॅरिफ प्लॅन 250 रुपयांना मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 500 रुपयांचे रिचार्ज केला तर तुम्हाला ते 125 रुपयांनी वाढेल. जर तुम्ही 1000 रुपयांचा रिचार्ज केला तर त्याचे मूल्य 250 रुपयांनी वाढेल आणि एकूण टॅरिफ किंमत 1250 रुपये होईल.