Motorola Edge 30 Ultra : सोडू नका अशी संधी! 200MP कॅमेरा असणारा हा शानदार फोन 9,500 रुपयांपेक्षा स्वस्तात करा खरेदी, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Motorola Edge 30 Ultra : तुम्ही आता 200MP कॅमेरा असणारा शानदार फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. Flipkart च्या खास ऑफरमध्ये तुम्हाला याचा लाभ घेता येईल.

या सेलमधून तुम्ही Motorola Edge 30 Ultra हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 74,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला सवलतींनंतर तो फोन 49,999 रुपयांत खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल.

एक्सचेंज ऑफरमध्ये पूर्ण सवलत मिळाल्यानंतर हा स्मार्टफोन तुमचा 49,999 – 40,600 रुपये म्हणजेच 9,399 रुपयांना खरेदी करता येईल. परंतु, हे लक्षात ठेवा की एक्सचेंजवर उपलब्ध असणारी अतिरिक्त सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे. बँक ऑफरमध्ये तुम्हाला या स्मार्टफोनची किंमत 1250 रुपयांपर्यंत कमी करता येईल. जर तुमच्याकडे Flipkart Axis Bank कार्ड असेल तर, तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल.

जाणून घ्या Motorola Edge 30 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. यामध्ये तुम्हाला Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर पाहायला मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यात 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल आणि 200-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 12-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्सचा समावेश असून उत्कृष्ट सेल्फी क्लिक करण्यासाठी, तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 60-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

कंपनीचा हा फोन डिस्प्लेच्या बाबतीतही उत्तम आहे. यामध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच या फोनचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. फोनमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 1250 nits आहे. या फोनची बॅटरी 4610mAh आहे. हे 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 50W वायरलेस फास्ट चार्जिंग मिळेल. असेच OS बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 12 वर काम करतो. हा फोन इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाइट या दोन रंग पर्यायांमध्ये येतो.