Motorola Smartphone : सर्वात कमी किंमतीचा नवीन Motorola स्मार्टफोन लवकरच होणार लॉंच; पाहा वैशिष्ट्ये

Motorola Smartphone : Moto G Play (2021) Smartphone January, 2021 मध्ये लाँच झाला होता. Moto G Play (2021) कंपनीने Snapdragon 460 प्रोसेसरसह उपलब्ध करून दिला आहे. आता बातमी अशी आहे की Moto G Play (2022) स्मार्टफोनबद्दल बातम्या येऊ लागल्या आहेत. Moto G Play (2022) हँडसेटची काही छायाचित्रे ऑनलाइन लीक झाली आहेत.

MediaTek Helio G37 प्रोसेसर Motorola च्या आगामी स्मार्टफोनमध्ये असू शकतो. नवीन मोटोरोला हँडसेटमध्ये 16 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Moto G Play (222) स्पेसिफिकेशन्स

प्रख्यात टिपस्टर इव्हान ब्लास (@evleaks) ने 91Mobiles च्या भागीदारीत Moto G Play (2022) चे फोटो आणि वैशिष्ट्ये लीक केली आहेत. लीक झालेल्या फोटोंवरून दिसून येते की डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी होल-पंच कटआउट असेल. हा स्मार्टफोन नेव्ही ब्लू कलरमध्ये पाहता येईल. हँडसेटच्या मागील पॅनलवर, डावीकडे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. याशिवाय, हँडसेटच्या डाव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आढळतात.

लीकनुसार, Moto G Play (2022) Android 12 सह लॉन्च केला जाईल. फोनमध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1,600 पिक्सेल असू शकते. आगामी मोटोरोला फोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर, 3 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज सारखी वैशिष्ट्ये असू शकतात.

याशिवाय, Moto G Play (2022) मध्ये 16 मेगापिक्सेल प्राइमरी रिअर आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर असू शकतात. मागील Moto G Play (2021) प्रमाणे, नवीन प्रकारात देखील 5000mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे. फोन 10W फास्ट चार्जिंगसह येईल. हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग मिळेल.

Moto G Play (2021) स्मार्टफोन गेल्या वर्षी निवडक बाजारपेठांमध्ये रिलीज झाला होता. हा फोन मिस्टी ब्लू कलर ऑप्शनमध्ये $169.99 (सुमारे 12,500 रुपये) मध्ये येतो.

Moto G Play (2021) स्मार्टफोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD (720×1,600 pixels) डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 460 प्रोसेसर, 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आणि Adreno 610 GPU सारखी वैशिष्ट्ये आहेत.

हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो 13 मेगापिक्सेल प्राइमरी आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी, 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola Smartphone
Motorola Smartphone