Noise Buds Venus : ‘या’ कंपनीने आणले 40 तास टिकणारे इयरबड, स्वस्तात येईल खरेदी करता; जाणून घ्या फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Noise Buds Venus : भारतीय बाजारातील नॉइज ही लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स असणारे इयरबड्स आणत असते. नुकतेच कंपनीने Noise Buds Venus लाँच केले होते. ज्याची विक्री आजपासून सुरु झाली आहे. इयरबड्स इन्स्टाचार्ज फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतात, जे फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 120 मिनिटे टिकू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे हे इयरबड तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनीची वेबसाइट आणि Amazon वरून तुम्हाला हे खरेदी करता येईल. कंपनीने आपले नवीन इयरबड्स कॉस्मिक ब्लॅक, गॅलेक्सी ग्रीन,लुनर आयव्हरी तसेच स्टेलर ब्राउन अशा चार रंगांच्या पर्यायांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जाणून घ्या नॉइज बड्स व्हीनसची शानदार वैशिष्ट्ये

कंपनीचे आगामी इअरबड्स इन-इअर स्टाइल डिझाइनसह येतात. चांगल्या कॉल गुणवत्तेसाठी, यामध्ये 10mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत आणि याचे क्वाड माइक पर्यावरणीय आवाज रद्दीकरण तंत्रज्ञानाला सपोर्ट करतात. त्याशिवाय कंपनीचे हे इयरबड सक्रिय आवाज रद्दीकरण (ANC) 30dB पर्यंत आणि 45 ms पर्यंत कमी लेटन्सीला समर्थन देतात.

कंपनीचे असे मत आहे की एएनसी बंद केल्यानंतर नवीन इअरबड्सना 40 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळेल. इतकेच नाही तर इयरबड्स इन्स्टाचार्ज फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतात, जे केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 120 मिनिटे टिकू शकतात, असा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.

इयरबड्सच्या इतर विशेष वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये हायपर सिंक तंत्रज्ञान, IPX5 स्प्लॅश आणि एआय व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, वॉटर रेझिस्टंट रेटिंग, टच कंट्रोल, ब्लूटूथ व्हर्जन 5.3 सपोर्ट यांचा समावेश असणार आहे.

जाणून घ्या नॉइज बड्स व्हीनसची किंमत

या कंपनीचे इयरबड्स कॉस्मिक ब्लॅक, गॅलेक्सी ग्रीन,लुनर आयव्हरी तसेच स्टेलर ब्राउन अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हे इयरबड्स आज 26 जुलैपासून कंपनीच्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजता आणि Amazon वरून तुम्हाला खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर 1,699 रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Amazon सूचीनुसार, त्याची मूळ किंमत 5499 रुपये इतकी आहे.