Noise ColorFit : स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करण्याची सुवर्णसंधी! कुठून खरेदी कराल? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Noise ColorFit : सध्या बाजारात स्मार्टवॉचची क्रेझ आली आहे. त्यामुळे अनेकजण भन्नाट फीचर्स असणारे स्मार्टवॉच खरेदी करत आहेत. मागणी जास्त असल्याने या स्मार्टवॉचच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता तुमच्यासाठी स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

तुम्हाला अशी जबरदस्त संधी Amazon सेलदरम्यान मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की याचा तुम्हाला लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे. पहा यादी.

फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो प्लस वॉच

या सेल दरम्यान फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो प्लसची किंमत रु.1,298 इतकी आहे. या वॉचमध्ये 1.83 इंच HD डिस्प्ले दिला आहे. ब्लूटूथ कॉलिंगसह येणारे हे वॉच 100 स्पोर्ट्स मोडसह येत असून त्याला IP67 रेटिंग देण्यात आले आहे.

नॉइज कलरफिट पल्स गो बझ

या सेल दरम्यान नॉईज कलरफिट पल्स गो बझ सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे. स्मार्टवॉचची किंमत 1,398 रुपये इतकी आहे. Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डवर ऑफर देण्यात येत आहे. याचा वापर करून तुम्हाला 2,200 रुपयांच्या वेलकम ऑफरचा लाभ घेता येईल. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

Amazfit Pop 3S स्मार्टवॉच

तुम्ही हे स्मार्टवॉच 4,498 रुपयात खरेदी करू शकता. तसेच इतर ऑफरमध्ये रु. 300 कॅशबॅक आणि रु. 2,200 वेलकम ऑफर दिली आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.96 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ब्लूटूथ कॉलिंगसह येणारे हे स्मार्टवॉच12 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येईल.

रेडमी स्मार्ट बँड प्रो स्मार्टवॉच

हे स्मार्टवॉच तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येईल. 1.47 इंच AMOLED डिस्प्ले असणाऱ्या या स्मार्टवॉचची किंमत 1,798 रुपये इतकी आहे. यात खेळापासून आरोग्यापर्यंतच्या फीचर्सचा समावेश केला आहे. ती पूर्ण चार्ज केल्यावर 14 दिवस टिकते.

बोट Xtend स्मार्टवॉच

हे स्मार्टवॉच तुम्हाला 1,798 रुपयांना खरेदी करता येईल. याठिकाणी इतर ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्हाला ते कमी किमतीत खरेदी करता येईल. 7 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ असणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. यात 14 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट ट्रॅकिंग, SpO2 आणि स्ट्रेस ट्रॅकिंग यासारखी आरोग्य फीचर्स आहेत.