Nokia Smartphone : नोकियाने लॉन्च केले दोन स्वस्तात मस्त फोन, चार कॅमेर्‍यांसह मिळणार जबरदस्त बॅटरी; किंमत फक्त..


जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर नोकियाचे नुकतेच लाँच झालेले स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ज्यावर कंपनी अनेक दिवसांपासून काम करत होती.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nokia Smartphone : नोकियाचे स्मार्टफोनने मार्केटमध्ये आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. एके काळी कंपनीच्या फोनची मजबुतीसाठी ओळख होती, अजूनही नोकियाच्या फोनला भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अशातच नोकियाने आपले दोन स्मार्टफोन लाँच केले आहे. ज्याची किंमत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा खूप कमी आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन आहे. यात नवीन वापरकर्त्यांना जबरदस्त बॅटरी पाहायला मिळू शकते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कंपनीचा नवीन फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह तुम्हाला खरेदी करता येईल. तुम्ही हे फोन वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. जाणून घेऊया या स्मार्टफोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

हे फोन कंपनीने यूएस मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. तुम्ही आता नोकिया C110 ग्रे कलरमध्ये सहज खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत $99 (सुमारे 8,150 रुपये) आहे. तसेच तुम्ही नोकिया C300 ब्लू कलर ऑप्शनमध्ये सहज खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर त्याची किंमत $139 (सुमारे 11,440 रुपये) इतकी आहे.

हे दोन्ही फोन या महिन्याच्या शेवटी यूएस मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत. हे फोन तुम्ही सेल्युलर आणि ट्रॅकफोन सारख्या वाहकांसह खरेदी करू शकता. जे वॉलमार्ट, टार्गेट, बेस्ट बाय आणि अॅमेझॉनवर विक्रीसाठी येतील.

कंपनीकडून Nokia C110 मध्ये 6.3-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. हा फोन MediaTek Helio P22 प्रोसेसरवर काम करेल. तसेच यात 13MP चा सिंगल रियर कॅमेरा दिला असून जो LED फ्लॅशसह येतो. यात 3000mAh बॅटरी दिली आहे.

तसेच कंपनीच्या नोकिया C300 मध्ये 6.52-इंचाचा एलसीडी डिस्प्ले उपलब्ध आहे जो Qualcomm Snapdragon 662 वर काम करेल. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून ज्याची मुख्य लेन्स 13MP आहे. तसेच यात 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध असणार आहे.

यामध्ये 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे, तर Nokia C110 मध्ये 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर हे दोन्ही फोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतात. जे नंतर मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. Nokia C300 मध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.