टेक्नोलाॅजी

पुणेकरांचा बसचा प्रवास होईल सोपा! एकाच क्लिकवर कळेल आता तुम्हाला तुमच्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन

Published by
Ajay Patil

बऱ्याचदा मोठ्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये आपल्याला बसने प्रवास करायचा असतो. परंतु त्या मार्गावर येणाऱ्या बसेस व त्यांचा टायमिंग व थांबे आपल्याला माहीत नसतात व त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. ही परिस्थिती प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये बऱ्याचदा उदभवते व प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर ताण सहन करावा लागतो.

समजा जर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे व ज्या मार्गाने जायचे आहे त्या मार्गावर धावणाऱ्या बसेस, त्या बसेसचे लाईव्ह लोकेशन व त्या मार्गावरील त्या बसचे थांबे आपल्याला कळले तर किती उत्तम होईल? त्यामुळे अशीच सर्विस आता पुणेकरांच्या सेवेसाठी येणारा असून पुणेकरांना आता एका क्लिकवर बसचे लाईव्ह लोकेशन मिळणार आहे. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत परिवहन मंडळ पुणेकरांना एक मोठी भेट देणार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

 पुणेकरांना एका क्लिकवर मिळेल बसचे लाईव्ह लोकेशन

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी असून पुणेकरांना आता महानगरपालिकेच्या बसचे लाईव्ह लोकेशन एका क्लिकवर मिळणार आहे. या माध्यमातून आता बस किती वेळात येणार याची वेळ तुम्हाला गुगल मॅप वरून पटकन कळणार असल्यामुळे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पीएमपीएलकडून या प्रकल्पावर काम सुरू असून या प्रकल्पामध्ये सुरुवातीला पाच एसटी डेपोतील 20 बस मध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे

व या माध्यमातून पीएमपीएल आणि गुगल यांच्यामध्ये एक करार देखील करण्यात आला आहे. जर आपण पीएमपीच्या बसेसचा विचार केला तर या माध्यमातून महिन्याला लाखो पुणेकर प्रवास करत असतात. प्रवाशांच्या सोयीकरताच महामंडळाच्या माध्यमातून आता गुगलच्या सोबत करार करण्यात आला आहे व आता गुगलकडून रियल टाईम लोकेशन मिळाल्यास त्यांचा प्रवास सुखाचा होणार हे मात्र निश्चित. सध्या या प्रकल्पावर जोरात काम सुरू आहे व ट्रायल पिरेड साठी ही सेवा सुरू होणार आहे.

 नोव्हेंबर 2022 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात मात्र या अडचणींमुळेच रखडला

साधारणपणे नोव्हेंबर 2022 मध्येच हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला होता. परंतु गुगल मॅपवर बस ट्रॅक होण्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी येत होत्या. कारण या प्रकल्पामध्ये जीपीएसला बसचा मार्ग ट्रॅक होण्यासाठी अचूक लोकेशनची आवश्यकता होती व त्यामुळे बरेच टेक्निकल काम करणे आवश्यक होते. त्यामुळेच आता या प्रकल्पामध्ये पीएमपीच्या बसेसमध्ये सर्व टेक्निकल गोष्टी इन्स्टॉल करण्यात येत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

साधारणपणे आकडेवारी पाहिली तर पीएमपीकडून आतापर्यंत 950 बसमध्ये तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत व 650 बसमध्ये अजून काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यातील पंधरा तारखेपासून यासाठीचे आवश्यक चाचणी घेण्यात येणारा असून  साधारणपणे दोन महिन्याचा कालावधी याकरिता जाणार आहे. ही सुविधा पुणेकरांसाठी सुरू होण्यास अजून नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी वाट पाहावी लागणार आहे. परंतु दिवाळीच्या दरम्यान ही सेवा सुरू होईल अशी माहिती परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे

 अशा पद्धतीने करावा लागेल या सुविधेचा वापर

या सुविधेचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना ज्या मार्गावर प्रवास करायचा असेल त्यांनी तो मार्ग गुगलवर टाकल्यानंतर त्या मार्गावर धावणाऱ्या सगळ्या पीएमपी बसेस,त्या बसेसचे थांबे यांची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil