OnePlus 11 5G : वनप्लस ही स्मार्टफोन निर्माता कंपनी सतत आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. ज्याची किंमत जरी इतर फोनच्या तुलनेत जास्त असली तरी त्यात फीचर्स उत्तम दिले जातात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीने आपली नवीन OnePlus 11 सीरिज लाँच केली होती.
ज्यात कंपनीकडून OnePlus 11 आणि OnePlus 11R हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले होते. अशातच आता कंपनीकडून OnePlus 11 5G चा नवीन प्रकार सादर केला जाणार आहे. ज्याचे नाव Marble Odyssey आहे. जाणून घ्या सविस्तर..
जाणून घ्या खासियत
दरम्यान कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. परंतु OnePlus 11 चा नवीन प्रकार फक्त रंगाच्या बाबतीत वेगळा असण्याची शक्यता आहे. या फोनला 6.7-इंचाचा QHD+ वक्र AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन पंच होल कटआउटसह येत असून याला 1300 Nits चा पीक ब्राइटनेस मिळणार आहे. हा फोन डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो.
Be one of the first few to own the all-new limited edition OnePlus 11 5G. Know more: https://t.co/ASW7ddTmhH pic.twitter.com/nWnSZzuHgI
— OnePlus India (@OnePlus_IN) May 12, 2023
आगामी स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला जात आहे, स्टोरेजचा विचार केला तर जो 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. Android 13 वर आधारित ऑक्सिजन 13.1 वर फोन काम करेल. कंपनीकडून यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो हॅसलब्लॅड ट्यून करण्यात आला आहे. तसेच त्याची मुख्य लेन्स 50MP Sony IMX890 सेन्सर आहे.
इतकेच नाही तर यात 48MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध असणार आहेत. याच्या फ्रंटमध्ये कंपनीकडून 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला समर्थन देते.
जाणून घ्या किंमत
सध्या तुम्हाला हा स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशन आणि दोन कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे. जर किमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 56,999 रुपये असून 16GB रॅम सह व्हेरिएंट 61,999 रुपयांमध्ये येतो. या किंमतीत तुम्हाला OnePlus 11 5G Marble Odyssey व्हेरिएंट खरेदी करता येऊ शकतो.