टेक्नोलाॅजी

OnePlus 11 5G : बंपर ऑफर! 10 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह आजच घरी न्या ‘हा’ OnePlus चा 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

OnePlus 11 5G : भारतीय बाजारात 5G स्मार्टफोन्स हे खूप महाग आहेत. त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे महागडे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु तुम्ही आता ते सहज खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर तुम्हाला आता कंपनी देत आहे.

या ऑफेरमुळे तुम्ही OnePlus 11 5G Marble Odyssey सवलतीसह सहज खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला हजारो रुपयांची बचत करता येईल. यामध्ये कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. जाणून घ्या OnePlus च्या या फोनची नवीनतम किंमत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे OnePlus 11 5G हा कंपनीचा एक प्रीमियम ग्रेड स्मार्टफोन आहे. किमतीबद्दल विचार केला तर त्याची किंमत 64,999 रुपये इतकी आहे. हा फोन 16GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येत असून कंपनीने तो टायटन ब्लॅक, इटरनल ग्रीन आणि मार्बल ओडिसी या प्रकारांमध्ये सादर केले आहे.

जाणून घ्या ऑफर

आता जर तुम्ही OnePlus 11 5G Marble Odyssey खरेदी केला तर त्यावर तुमची 10 हजार रुपयांपर्यंतची बचत होईल. OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, एक्सचेंज बोनससह तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.

इतकेच नाही तर ICICI बँकेच्या क्रेडिटच्या मदतीने 2000 रुपये अतिरिक्त वाचवण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या की ही ऑफर OnePlus 11 5G Marble Odyssey प्रकारावर उपलब्ध असणार आहे. समजा तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला 64,999 रुपयांचा हा स्मार्टफोन 54,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही ऑफर कधीपर्यंत, याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनचा विचार केला तर OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 6.7 इंचाचा AMOLED QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120 Hz रिफ्रेश दर, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस आणि HDR 10 साठी समर्थन मिळत असून त्याचे रिझोल्यूशन 3216X1440 इतके असेल.

कॅमेरा सेटअप

कंपनीने आपल्या OnePlus 11 5G च्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर असून जो OIS सपोर्टसह येतो. यामध्ये 48MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 32MP टेलिफोटो लेन्स दिली आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

प्रोसेसर

OnePlus 11 5G मध्ये Snapdragon 8 Gen 2 मोबाईल प्लॅटफॉर्म वापरला आहे. तसेच स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 16GB रॅम, 256GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी 100W SUPERVOOC चार्जर दिला आहे.

Ahmednagarlive24 Office