टेक्नोलाॅजी

OnePlus 13 ठरेल 24 जीबी रॅम ऑफर करणारा वनप्लसचा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन! वाचा भारतात कधी होणार लाँच?

Published by
Ajay Patil

OnePlus 13 Smartphone:- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत व त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या आर्थिक बजेटनुसार पर्याय उपलब्ध होतात. यामध्ये काही हजारापासून तर लाखो रुपयांपर्यंत किमतीचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते.

परंतु तरुणाईच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्यामध्ये वनप्लसचे जे काही स्मार्टफोन आहेत त्यांच्याबद्दल जास्त प्रमाणामध्ये क्रेझ दिसून येते व या वनप्लसचे अनेक स्मार्टफोन सध्या बाजारपेठेत आहेत. भारतामध्ये वनप्लसचे चहाते मोठ्या प्रमाणावर असून त्यांना आता लवकरच एक गुड न्यूज मिळणार आहे.

कारण वनप्लस आता वनप्लस तेरा लॉन्च करणार असून सोमवारी वनप्लसचा नवीन फ्लॅगशिप वनप्लस 13 चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता तो भारतात कधी लॉन्च होईल याची उत्सुकता लागून राहिली असून मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन जानेवारी 2025 मध्ये भारतात लॉन्च केला जाईल अशी शक्यता आहे.

कंपनीने वनप्लस 13 हा स्मार्टफोन ओशन, ब्लॅक एक्लिप्स आणि आर्कटीक डाऊन या तीन शेडमध्ये उपलब्ध करून दिला आहे. महत्वाचे म्हणजे हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे ज्याला आयपी 68 आणि आयपी 69 रेटिंग असून जे या स्मार्टफोनचे पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे.

काय आहे वनप्लस 13 मध्ये विशेष?
चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेले जर व्हेरिएंट बघितले तर त्यानुसार वनप्लस तेरा स्नॅपड्रॅगन 8 एलिट चीप, 24 जीबी रॅम वापर करणारा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन ठरणार आहे.परंतु तो भारतामध्ये 16 जीबी पर्यंत मर्यादित असू शकतो असं देखील कंपनीने म्हटले आहे.

तसेच या स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50Wवायरलेस चार्जिंग,6000mAh ची ऊर्जा असलेली कार्बन सिलिकॉन अँनोड बॅटरीचा वापर करणारा देखील हा पहिला स्मार्टफोन आहे.तसेच या स्मार्टफोनमध्ये वक्र डिस्प्ले व त्यासोबत 2k रेझोल्युशन,120Hz रिफ्रेश रेट तसेच फ्लॅट स्क्रीन असणार आहे

व त्यासोबतच अल्ट्रासोनिक फिंगर प्रिंट सेंसर असणारा देखील वनप्लसचा पहिला स्मार्टफोन असणार आहे. वनप्लस तेरा मध्ये अँड्रॉइड 15 चा आधार असलेले ऑक्सिजन ओएस ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली असून ही सिस्टम हलकी आणि जास्त फिचरयुक्त असेल.

कॅमेऱ्याच्या बाबतीत बघितले तर या फोनमध्ये हॅसेलब्लाड ट्युनिंगसह ट्रिपल कॅमेरा दिला आहे. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार बघितले तर वनप्लस 13 कटिंग एडज इनोव्हेशन तसेच फास्ट आणि स्मूथ परफॉर्मन्स, एआय सोबत एलिमेंट आणि शोस्टॉपिंग डिझाईन जो मायक्रो फायबर वेगन लेदर आणि बॅक पॅनल फीचर्ससह लॉन्च होणारा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन आहे.

Ajay Patil