OnePlus 9 5G : वनप्लसचा कोणताही स्मार्टफोन असो त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या बाजारात वनप्लसच्या स्मार्टफोनची क्रेझ तयार झाली आहे. त्यामुळे कंपनी सतत नवनवीन आणि शानदार फिचर असणारे स्मार्टफोन लाँच करत असते.
काही दिवसांपूर्वी कंपनीने OnePlus 9 5G हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 49,999 रुपये आहे. जो तुम्हाला आता 30 टक्के सवलतीसह खरेदी करता येईल. Flipkart वर तुम्हाला अशी भन्नाट ऑफर मिळत आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनवर बँक ऑफर तसे इतर ऑफर मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येईल.
जाणून घ्या वनप्लस 9 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असून तो 8 GB, 128 GB आणि 12 GB, 256 GB व्हेरियंटमध्ये येतो. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला Adreno 660 GPU सह Snapdragon 888 चिपसेट मिळेल. या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.55-इंच फ्लुइड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असून यात डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे.
वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर यांचा समावेश आहे. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमधील बॅटरी 4500mAh ची असून ही बॅटरी 65T वार्प चार्जिंगला सपोर्ट करते. तर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणारा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Oxygen OS वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये WiFi 802.11 a/b/g/n/ac/ax, Bluetooth 5.2, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीचा हा फोन आर्क्टिक स्काय, एस्ट्रल ब्लॅक आणि विंटर मिस्ट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला सहज खरेदी करता येईल.