OnePlus Ace 2 Pro : 50MP कॅमेरा आणि 150W जलद चार्जिंगसह लवकरच लाँच होणार OnePlus चा फोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Ace 2 Pro : OnePlus च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आता आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Ace 2 Pro लाँच केला आहे. यात आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनीने शानदार फीचर्स दिली आहेत. जो इतर कंपन्यांना टक्कर देईल.

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. OnePlus Ace 2 Pro मध्ये कंपनीकडून 50MP कॅमेरा आणि 150W जलद चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत.

जाणून घ्या खासियत

कंपनीच्या नवीन OnePlus Ace 2 Pro मध्ये 1.5K रिझोल्यूशन (2772×1240 पिक्सेल), 450 PPI, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2160Hz PWM तसेच 6.7-इंच वक्र OLED डिस्प्ले देण्यात येत आहे. या फोनच्या फोनमध्ये मध्यभागी पंच-होल 10-बिट HDR पॅनेल असून जो 1600 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला समर्थन देते.

कॅमेरा

वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी, यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल सोनी IMX890 प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स तसेच 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.

तर कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वायफाय 7, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, जीएनएसएस आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट दिला आहे. या फोनच्या इतर प्रमुख फीचर्समध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर, एक IR ब्लास्टर यांचा समावेश असेल.

150W जलद चार्जिंग सपोर्ट

हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असून यात 24GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिले आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित ColorOS 13.1 वर काम करेल. हा फोन 150W SuperVOOC फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करेल. या फोनमध्ये 3 अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे मासिक सिक्युरिटी पॅच अपडेट दिले जात आहेत.

जाणून घ्या OnePlus Ace 2 Pro ची किंमत

कंपनीचा हा फोन सध्या चीनमध्ये OnePlus Ace 2 Pro लॉन्च झाला आहे. किमतीचा विचार केला तर या फोनच्या 12GB 256GB वेरिएंटची किंमत ~$410 (सुमारे 34 हजार रुपये), 16GB 512GB व्हेरिएंटची किंमत ~$465 (सुमारे 39 हजार रुपये) आणि 24GB 1TB व्हेरिएंटची किंमत ~$550 (सुमारे 45 हजार रुपये) इतकी आहे.

हा स्मार्टफोन आजपासून प्री-ऑर्डर करता येईल आणि त्याची विक्री 23 ऑगस्टपासून सुरू होईल. जो तुम्हाला अरोरा ग्रीन किंवा टायटॅनियम ग्रे रंग पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. तसेच हा फोन Genshin Impact Paimon गिफ्ट बॉक्समध्ये येतो. फोनची (16GB 512GB) किंमत ~$500 (जवळपास 41 हजार रुपये) असून तो 30 ऑगस्ट रोजी खरेदी करता येईल.