टेक्नोलाॅजी

OnePlus Nord : जबरदस्त फीचर्ससह वनप्लस लवकरच लॉन्च करत आहे नवीन फोन, बघा किंमत

Published by
Ahmednagarlive24 Office

OnePlus Nord : भारतात वनप्लस कपंनीचे फोन खूप लोकप्रिय आहेत. अशातच कंपनी दर महिन्याला आणि दरवर्षी आपले मजबूत फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करताना दिसते. आता पुन्हा एकदा कंपनी आपला आगामी स्मार्टफोन OnePlus Nord 4 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

वनप्लसच्या या नवीन फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले आहे. हा फोन AMOLED पॅनलने सुसज्ज असणार आहे. तसेच हा फोन 1.5K रिझोल्युशनसह येतो. OnePlus Nord 4 नवीन फोन OnePlus Ace 3V ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती आहे. कपंनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन लवकरच बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे.

OnePlus Nord 4 ची वैशिष्ट्ये

जर आपण OnePlus Nord 4 च्या फीचर्सबद्दल बोललो तर या फोनचे फीचर्स खूप मजबूत आहेत. हा फोन OnePlus Ace 3V चे रीब्रँडेड व्हर्जन असू शकते. OnePlus Nord 4 च्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले मिळू शकतो. हा फोन AMOLED पॅनेलने सुसज्ज असणार आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K असेल. तसेच, हा फोन रिफ्रेश रेट 120Hz सह येऊ शकतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 2150 nits चा पीक ब्राइटनेस दिसू शकतो.

OnePlus Nord 4 च्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असेल. हा फोन Android 14 सह येऊ शकतो, जो OxygenOS 14 सह उपलब्ध होऊ शकतो. या फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो.

OnePlus Nord 4 च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी आहे. हा फोन 100W फास्ट चार्जिंग फीचरसह येऊ शकतो. या फोनमध्ये 16 GB पर्यंत रॅम क्षमता आणि 512 GB पर्यंत स्टोरेज पाहता येते.

OnePlus Nord 4 च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये OIS सपोर्ट मिळू शकतो. हा फोन 8 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सरसह येऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटला मिळू शकतो.

OnePlus Nord 4 किंमत

OnePlus Nord 4 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या किंमतीबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण या फोनची किंमत 30 हजार ते 32 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.

Ahmednagarlive24 Office