टेक्नोलाॅजी

24 जून पासून मार्केटमध्ये वनप्लस करणार धूम! येत आहे वनप्लसचा ‘वन प्लस नॉर्ड CE4’ स्मार्टफोन, कमी किमतीत मिळतील भन्नाट वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहक हे त्यांना परवडतील या किमतीमध्ये चांगले वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन विकत घेत असतात. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्याला बरीच नावे सांगता येतील व यामधीलच प्रसिद्ध नाव म्हणजे टेक कंपनी वनप्लस हे होय.

वनप्लसचे अनेक स्मार्टफोन सध्या बाजारपेठेत असून ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे आपल्याला दिसून येते. याच पद्धतीने आता वनप्लस 24 जून या दिवशी वनप्लस नॉर्ड CE4 लॉन्च करणार असून याबाबतची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लेट फॉर्म एक्स वर दिलेली आहे.

या स्मार्टफोनमध्ये अनेक नवनवीन अशी वैशिष्ट्ये देण्यात आलेली असून याची किंमत देखील कमी ठेवण्यात आलेली आहे. नक्कीच वनप्लस खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरणार आहे.

 24 जून रोजी मार्केटमध्ये येत आहे वनप्लस नोर्ड CE4 लाईट स्मार्टफोन

टेक कंपनी वनप्लस 24 जून 2024 रोजी वनप्लस नॉर्ड CE4 लाईट भारतीय बाजारात लॉन्च करणारा असून या स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाची फीचर्स देण्यात आलेले आहेत. या स्मार्टफोनमध्ये इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह 6.67 इंच FHD+AMOLED डिस्प्ले तसेच 50 मेगापिक्सल सोनी LYTIA कॅमेरा आणि अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम वर हा फोन काम करणारा कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेट असू शकतो.

 कसा असेल या स्मार्टफोनचा डिस्प्ले?

या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंच फुल एचडी+AMOLED डिस्प्ले देण्याची शक्यता असून स्क्रीनचे रिझोल्युशन 1080×2436p असू शकते आणि त्याची कमाल ब्राईटनेस 1300 nits असू शकते.

 या स्मार्टफोनचा कॅमेरा कसा असेल?

उत्तम फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड CE4 लाईटच्या मागील पॅनलमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि आठ मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा असू शकतो. तसेच सेल्फी आणि उत्तम व्हिडिओ कॉलिंग करिता 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

 या स्मार्टफोनची रॅम किती आहे?

या स्मार्टफोन मध्ये दोन स्टोरेज पर्याय कंपनीच्या माध्यमातून दिले जातील अशी शक्यता आहे व यामध्ये चार जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि सहा जीबी रॅम सह २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असेल.

 बॅटरी आणि चार्जिंग

जर आपण काही मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर या कंपनीच्या येऊ घातलेल्या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.

 कनेक्टिव्हिटी साठी कुठले पर्याय देण्यात येतील?

या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, 3G, 2G, वायफाय तसेच ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एफएम रेडिओ आणि यूएसबी टाईप सी पोर्ट आहे.तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी यामध्ये मायक्रो एसडी कार्डचा पर्याय देण्यात आलेला आहे.

 किती असू शकते या स्मार्टफोनची किंमत?

वनप्लसच्या या वनप्लस नॉर्ड CE4 लाईट स्मार्टफोनची किंमत अठरा हजार रुपये असू शकते.

Ajay Patil