OnePlus Nord CE 3 5G : मस्तच..! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार OnePlus चा 5G फोन, पहा किंमत आणि ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Nord CE 3 5G : वनप्लसच्या स्मार्टफोनमुळे तरुणाई अक्षरशः वेडी झाली आहे. कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये सतत नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देत असते. त्यामुळे कंपनीच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

लवकरच कंपनीच्या नवीन Nord CE 3 5G स्मार्टफोन विक्री सुरु होणार आहे. जो तुम्हाला खूप कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर.

या दिवशी होणार विक्रीला सुरुवात

टिपस्टर योगेश ब्रार यांनी असा दावा केला आहे की, कंपनीचा आगामी Nord CE 3 5G स्मार्टफोन 5 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. विक्रीच्या तारखेशिवाय टिपस्टरने Nord CE 3 5G वर उपलब्ध असणाऱ्या बँक ऑफर देखील उघड करण्यात आल्या आहेत.

किंमत आणि ऑफर

कंपनीचा हा नवीन मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन असून जो लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन तुम्ही कंपनीच्या वेबसाइटसह Amazon वरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची विक्री ऑगस्टमध्ये सुरू होईल असा टिपस्टर ब्रारने खुलासा केला आहे तसेच अधिकृत वेबसाइटने असेही कळवले आहे की हा फोन आठ दिवसांत, म्हणजे 5 ऑगस्ट रोजी खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

सेलच्या तारखेशिवाय, टिपस्टरने या स्मार्टफोनवर उपलब्ध बँक ऑफरही उघड केल्या आहेत. टिपस्टरने याबाबत माहिती दिली की ग्राहकांना निवडक बँक कार्डांवर 2,000 रुपयांची सवलत मिळेल. या सवलतीनंतर, Nord CE 3 5G चे बेस मॉडेल 24,999 रुपयांना खरेदी करता येईल.

स्टोरेजचा विचार केला तर या फोनचे बेस मॉडेल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येईल तर फोनचा टॉप-एंड मॉडेल 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येईल. तर बँक ऑफर 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतात कंपनीकडून हा स्मार्टफोन एक्वा सर्ज आणि ग्रे शिमर अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. कंपनी लवकरच अधिकृतपणे विक्रीची तारीख आणि ऑफर जाहीर करू शकते.

फीचर्स

OnePlusच्या या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 nits पीक ब्राइटनेससह 6.72-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरद्वारे समर्थित असून हा फोन 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज पर्यायांत येतो. हा फोन Android 13 वर आधारित Oxygen OS 13.1 वर काम करेल. या फोनमध्ये एकाच वेळी 24 अॅप्स उघडे ठेवता येतील असा दावा कंपनीने केला आहे.

स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX890 प्राथमिक सेन्सरसह तीन मागील कॅमेरे दिले जाणार आहेत. तसेच, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि मागील बाजूस 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स मिळेल. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली असून हे चार्जिंग तंत्रज्ञान फक्त 15 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज करते. फोनच्या इतर खास फीचर्समध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्पीकर्स, 5G सपोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ब्लूटूथ 5.2 आणि Wi-Fi 6 सपोर्ट यांचा समावेश असणार आहे.