OnePlus Nord CE 3 Lite : स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असणारा 5G OnePlus, ‘या’ ठिकाणाहून घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Nord CE 3 Lite : स्मार्टफोनचा वाढता वापर पाहता सर्वच कंपन्या आपआपले नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करू लागल्या आहेत. अशातच आता प्रीमियम स्मार्टफोन कंपनी वनप्लस देखील सर्वसामान्यांच्या बजेटमधील दमदार फोन लॉन्च करत आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला OnePlus Nord CE 3 Lite फोन लाँच केला होता. ज्यात 108 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. शिवाय त्यात दमदार कॅमेऱ्यासह 67W फास्ट चार्जिंगही दिली आहे. आता तो तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

स्वस्तात खरेदी करण्याची संधी

कंपनीने OnePlus Nord CE 3 Lite 5G चे बेस व्हेरिएंट 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह काही दिवसांपूर्वी लाँच केला आहे. हा प्रकार सध्या Amazon वर 19,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येत आहे. परंतु या स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.

जाणून घ्या ऑफर

जरी आता या स्मार्टफोनवर अनेक बँक ऑफर उपलब्ध असल्या तरी, तुम्ही HSBC बँकेकडून EMI व्यवहार करून फोनवर 2,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तुम्हाला बँकेच्या ऑफरचा पूर्ण लाभ मिळेल असे जरी आता गृहीत धरले तरी या स्मार्टफोनची किंमत रु. 17,999 इतकी असणार आहे.

इतकेच नाही तर जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर तुम्हाला एक्सचेंज बोनसचा फायदा घेऊन फोनची किंमत आणखी कमी करता येईल. परंतु हे लक्षात ठेवा की या एक्सचेंज बोनसची किंमत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या खासियत

वनप्लसचा हा स्मार्टफोन 8GB RAM 128GB स्टोरेज आणि 8GB RAM 256GB स्टोरेज अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी सपोर्ट मिळत आहे. तसेच या स्मार्टफोनमधील एकूण रॅम 16GB आहे. फोनमध्ये 6.72-इंचाचा AMOLED डिस्प्ले असून तो 120 Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस (1080×2400) रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.

वापरकर्त्यांसाठी या स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरे (108MP 2MP 2MP) आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. शिवाय या फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी मिळेल. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695G प्रोसेसरने सुसज्ज असून OxygenOS वर आधारित Android 13 वर काम करेल. कंपनीचा असा दावा आहे की हा फोन फक्त 30 मिनिटे चार्ज करून दिवसभर वापरता येईल. पूर्ण चार्जमध्ये यावर 17 तास YouTube व्हिडिओ पाहता येतात.