OnePlus Offer : बंपर ऑफर! OnePlus चा शक्तिशाली फोन स्वस्तात खरेदी करता येणार, होईल 15,000 रुपयांचा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Offer : सध्या बाजारात OnePlus च्या स्मार्टफोनला चांगलीच मागणी आहे. मागणी जास्त असल्याने आता कंपनीही सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करू लागली आहे. आता तुमच्याकडे कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.

अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी Amazon ने आणली आहे. त्यामुळे तुमची स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकेल. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Oneplus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता यावर ऑफर मिळत आहे.

Amazon वर विशेष ऑफर्समुळे तुम्हाला आता आणखी कमी किमतीत OnePlus फोन खरेदी करता येईल. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या Oneplus Nord CE 2 Lite 5G ची किंमत जरी कमी असली तरी फीचर्सच्या बाबतीत ते विभागातील इतर स्मार्टफोनशी स्पर्धा करतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह 64MP AI ट्रिपल कॅमेरा आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक आणि उच्च रिफ्रेश रेटसह मोठा डिस्प्ले दिला आहे.

मिळेल बंपर डिस्काउंट

किमतीचा विचार केला तर Oneplus Nord CE 2 Lite 5G च्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची भारतीय बाजारपेठेत किंमत 19,999 रुपये इतकी आहे. तो Amazon वर 10% सवलत दिल्यानंतर, 17,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट केला आहे. त्याशिवाय या ठिकाणी सर्व ग्राहकांना 200 रुपयांच्या कूपन डिस्काउंटचा लाभही मिळत आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 17,799 रुपये इतकी असणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. हा फोन ब्लॅक डस्क आणि ब्लू टाइड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

आता Axis Bank किंवा Citi Bank क्रेडिट कार्डद्वारे EMI व्यवहारांवर आणि OneCard क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटवर 1000 रुपयांची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच इतर निवडक बँक कार्डांवरदेखील अशाच ऑफरचा लाभ दिला आहे.

इतकेच नाही तर तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात या फोनवर एकूण 12,500 रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. परंतु, यासाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असावा. समजा तुम्हाला याचा पूर्ण लाभ मिळत नसला तरीही, या सर्व ऑफरसह Nord CE 2 Lite 5G ची किंमत सहजपणे 15,000 रुपयांपेक्षा कमी केली जाईल.

जाणून घ्या Nord CE 2 Lite 5G चे फीचर्स

OnePlus च्या बजेट स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर दिला आहे. तसेच 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

या फोनच्या मागील पॅनलवर, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सरसह 64MP मुख्य सेन्सर दिला आहे. फोन 16MP सेल्फी कॅमेरासह येतो. या फोनची 5000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान केली आहे. तसेच या फोनमध्ये ऑथेंटिकेशनसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.