Oppo Smartphone : “या” दिवशी लॉन्च होणार Oppo A1 Pro स्मार्टफोन; फीचर्स आहे खूपच खास; बघा…

Oppo Smartphone : लवकरच Oppo आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oppo A1 Pro अवघ्या काही दिवसात बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या लॉन्च डेटचाही खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, Oppo A1 Pro हा या मालिकेतील सर्वात प्रगत स्मार्टफोन असेल. कंपनी हा शक्तिशाली स्मार्टफोन 16 नोव्हेंबर 2022 रोजी चीनमध्ये सादर करेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Oppo A1 Pro 5G चे फीचर्स लॉन्च होण्यापूर्वीच समोर आले आहेत. कंपनीने पोस्टर जारी करून Oppo A1 Pro ची घोषणा केली आहे. स्मार्टफोनचे डिझाईनही खूपच आकर्षक आहे. यामध्ये कर्व्ड एज डिस्प्लेमध्ये दोन कॅमेरा मॉड्यूल रिंग देण्यात आल्या आहेत.

Advertisement

खास गोष्ट म्हणजे या Oppo स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Oppo A1 Pro मध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. याव्यतिरिक्त, यात 10 बिट रंग आणि स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल.

प्रोसेसर आणि इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर Oppo A1 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. यासह, 12 GB LPDDR4x रॅम आणि 256 GB स्टोरेज उपलब्ध असेल. एवढेच नाही तर स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉटही उपलब्ध असेल.

Advertisement

Oppo A1 Pro मध्ये 108-मेगापिक्सेल कॅमेरासह 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो. Oppo A1 Pro ला 5,000 mAh बॅटरीमधून 67W फास्ट चार्जिंग मिळेल. कंपनी अनेक स्मार्टफोन्सशी संबंधित काही तपशील शेअर करेल अशी अपेक्षा आहे.