Oppo A17 : होणार 11 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत! ओप्पोच्या ‘या’ स्वस्त फोनवर मिळत आहे भन्नाट डिस्काउंट, पहा संपूर्ण ऑफर


जर तुम्हाला स्वस्तात शानदार फीचर्स असणारा फोन खरेदी करायचा असेल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. कारण तुम्ही पुन्हा एकदा ओप्पोचा लोकप्रिय फोन खरेदी करू शकता.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo A17 : ओप्पो या लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Oppo A17 हा फोन लाँच केला होता. जो तुम्ही आता खूप स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 14,999 रुपये आहे. जो तुम्ही आता 12,499 रुपयात सहज खरेदी करू शकता.

जर तुम्ही हा फोन SBI चे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केला तर तुम्हाला या फोनवर 1,000 रुपयांची झटपट सवलत मिळू शकते. ऑफर येथे संपली नाही. तुम्ही आता एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत आणखी 11,800 रुपयांनी कमी करू शकता.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीने या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 4 GB व्हर्च्युअल रॅम देत असून तुम्हाला यासोबत 8 GB रॅम मिळणार आहे. या फोनची अंतर्गत मेमरी 64 GB आहे. परंतु तुम्हाला आता तुम्ही मायक्रो SD कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज वाढवता येईल. इतकेच नाही तर MediaTek Helio G35 चिपसेट या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून पाहायला मिळणार आहे.

या बजेट फोनमध्ये एक उत्तम डिस्प्ले तुम्हाला मिळू शकतो. हा डिस्प्ले 720×1612 पिक्सेल रिझोल्यूशनसह येत असून त्याचा आकार 6.56 इंच इतका आहे. या HD+ डिस्प्लेचा रिफ्रेश दर 60Hz आहे. तसेच वापरकर्त्यांसाठी कंपनीने फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे दिले आहेत. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश असणार आहे.

तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5 मेगापिक्सेल कॅमेरा पाहायला मिळू शकतो. या फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असणार आहे. तुम्ही हा फोन सनलाइट ऑरेंज आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये अँड्रॉइड 12 वर आधारित ColorOS 12.1 असेल. इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला फोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 5, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय पाहायला मिळतील.