टेक्नोलाॅजी

Oppo Smartphone : 29 फेब्रुवारीला ओप्पो लॉन्च करत आहे धांसू स्मार्टफोन, इतकी असेल किंमत !

Published by
Ahmednagarlive24 Office

Oppo Smartphone : चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo चा F25 Pro 5G फोन येत्या 29 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. कंपनीने या फोनच्या काही वैशिष्ट्यांसह, त्याचे डिझाइन देखील उघड केले आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7050 SoC प्रोसेसर दिला जाईल. तसेच डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 Hz असेल. यासह या फोनमध्ये खूप काही खास पाहायला मिळेल. तसेच याची किंमत देखील खूप खास असेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टने दावा केला आहे. या फोनची किंमत 22,999 रुपये आणि 24,999 रुपये असू शकते. तसेच त्याच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देखील मिळतील.

Oppo F25 Pro 5G Android 14 आधारित UI वर चालेल. यात 1,100 निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह फुल एचडी डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यापूर्वी, कंपनीने सांगितले होते की, त्याच्या ट्रिपल रिअर कॅमेरा युनिटमध्ये 64-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, अल्ट्रा-वाइड लेन्ससह 8-मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल.

याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा असेल. तसेच या फोनची बॅटरी 67 W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल असा दावा देखील करण्यात आला आहे.

अलीकडेच कंपनीने Reno 11F 5G लाँच केला आहे. याआधी या स्मार्टफोन सीरिजमध्ये Oppo Reno 11 5G आणि Reno 11 Pro 5G सादर करण्यात आले होते. या मालिकेतील सर्व स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित ColorOS 14 वर चालतात.

कंपनीच्या 11F 5G मध्ये MediaTek Dimension 7050 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याचा 6.7-इंचाचा AMOLED फुल एचडी डिस्प्ले (1,080 x 2,412 पिक्सेल) 120 Hz च्या रीफ्रेश रेटसह, 240 Hz चा टच सॅम्पलिंग रेट, 394 ppi ची पिक्सेल डेन्सिटी आणि 1,100 nits पर्यंत पीक ब्राइटनेस लेव्हल असे स्पेसिफिकेशन अनुभवायला मिळतील. ओप्पोच्या मिड-रेंज स्मार्टफोन्सच्या विक्रीत गेल्या काही वर्षांत वाढ पाहायला मिळाली आहे. अशातच येणार फोन देखील मार्केटमध्ये खळबळ माजवणार असा अंदाज लावला जात आहे.

Ahmednagarlive24 Office