Oppo Smartphone Offer : ओप्पोच्या ‘या’ फोनवर आज मिळतेय तगडी ऑफर! होईल 15 हजारांपेक्षा जास्त फायदा, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo Smartphone Offer : जर तुम्हाला कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारे ओप्पोचे 5G स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर आता तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. Amazon वर ओप्पोच्या दोन स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे.

या सेलमधून तुम्ही आता Oppo A78 5G आणि Oppo A58 हे दोन स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. तुम्हाला स्मार्टफोन खरेदीवर 15 हजारांपेक्षा जास्त फायदा होईल, जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

जाणून घ्या Oppo A78 5G वर मिळणारी ऑफर

Oppo च्या या जबरदस्त फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. किमतीचा विचार केला तर त्याची मूळ किंमत 21,999 रुपये इतकी आहे. परंतु डील ऑफ द डे तुम्ही हा फोन 14% डिस्काउंटनंतर 18,999 रुपयांना खरेदी करता येईल.

तर कंपनी या फोनवर एकूण 1899 रुपयांची बँक डिस्काउंटही देत ​​आहे. शिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 15,500 रुपयांपर्यंत स्वस्त असेल. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा फोन उत्तम आहे.

तर कंपनीकडून या फोनमध्ये 6.56 इंच डिस्प्ले देण्यात येत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन रियर कॅमेरे दिले आहेत. यात 50 मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2 मेगापिक्सेलचा मागील कॅमेऱ्याचा समावेश केला आहे. शिवाय सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo A58 ऑफर

कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन असून यात 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्याची मूळ किंमत 18,999 रुपये इतकी आहे. आता तुम्ही याच्या सेलमध्ये तो अवघ्या 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. इतकेच नाही तर बँक ऑफरमध्ये या स्मार्टफोनची किंमत आणखी एक हजार रुपयांनी कमी करता येईल.

एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 14,100 रुपयांनी आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. तसेच या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून या फोनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर 6 GB पर्यंत विस्तारित रॅम वैशिष्ट्य असणाऱ्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. शिवाय या फोनची बॅटरी 5000mAh आहे, जी 33W फास्ट चार्जिंग आहे.