टेक्नोलाॅजी

Khedut Mini Tiller: लहान शेती आणि फळबागांसाठी उपयुक्त आहे खेडूतचे हे मिनी टिलर! कमी वेळात होतील शेतीची कामे आणि वाचेल खर्च

Published by
Ajay Patil

Khedut Mini Tiller:- शेती क्षेत्रामध्ये सध्या विविध कामांकरिता अनेक यंत्र विकसित करण्यात आलेले असून यंत्रांच्या वापरामुळे आता शेतीची कामे कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झालेले आहे

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हे यंत्र वापरले जाते व शेतीतील अनेक यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. परंतु ट्रॅक्टर ऐवजी आता बरेच शेतकरी शेतातील अनेक कामे पावर टिलरच्या साह्याने करण्याला पसंती देतात.

या मिनी टिलरचा वापर करून कमी खर्चात नांगरणी तसेच पेरणी सारखी अनेक शेतीची कामे करता येणे शक्य झालेली आहे. बाजारामध्ये अनेक चांगल्या कंपन्यांनी आधुनिक आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असे पावर टिलर लॉन्च केलेले आहेत.

त्यामध्ये खेडूत ही कंपनी देखील खूप प्रसिद्ध असून अत्याधुनिक अशी कृषी यंत्र बनवण्यामध्ये या कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे.

ही कंपनी मोठ्या प्रमाणावर पावर टिलर देखील बनवते. असाच या कंपनीचा उत्कृष्ट असा पावर टिलर म्हणजे  KAMT 06 हा होय. हा पावर टिलर लहान शेती क्षेत्राची रचना आणि गरज पाहून खास करून डिझाईन करण्यात आलेला आहे.

KAMT 06 मिनी टिलरची वैशिष्ट्ये

खेडूत या कंपनीचे मिनी टिलर मॉडेल अतिशय शक्तिशाली आणि कॉम्पॅक्ट डिझाईन केलेले आहे. लहान शेतकऱ्यांची गरज पाहून त्यानुसार हे पावर टिलर बनवण्यात आलेले आहे. या टिलरच्या हलक्या आणि कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे ते डोंगराळ भागात देखील वापरले जाणे शक्य आहे.

कोरड्या आणि ओल्या भातशेती नांगरण्यासाठी देखील हे योग्य आहे. याचे इंजन हे डिझेल इंजन असून ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. डिझेल पेट्रोल पेक्षा स्वस्त असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाचतो. तसेच हे वजनाने अतिशय हलके असल्यामुळे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सोपे आहे.

नांगरणी सारखे काम हा मिनी टिलर उत्कृष्ट पद्धतीने करतो व शेतीची मशागत करण्यासाठी उत्कृष्टपणे शेतकऱ्यांना मदत करतो. खेडूत कंपनीचा हा पावर टिलर सहा एचपीचा असून त्याची इंधन टाकीची क्षमता 3.5 लिटर इतकी आहे. हा शेतीची 100 ते 200 mm खोली  पर्यंत मशागत करू शकतो.

वजन 128 किलो आहे. खेडूत कंपनीच्या या मिनी टिलरचा वापर करून शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेवर पूर्ण करता येणे शक्य असून कमीत कमी मजुरी मध्ये शेतीची कामे सहजपणे पूर्ण करू शकतात. तसेच हा टिलर वापरल्यामुळे मातीची गुणवत्ता देखील सुधारते व जमिनीची उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.

 मिनी टिलर शेतकऱ्यांना कसे ठरते फायद्याचे?

मिनी टिलरला गार्डन टिलर असे देखील म्हणतात. अगदी अरुंद आणि लहान जागेत देखील ते काम करण्यास सक्षम असते. त्याची कॉम्पॅक्ट डिझाईन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चांगली क्षमता यामुळे ते शेतात नांगरणी करण्यास देखील सक्षम असते.

अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी शेती कामासाठी मिनी टिलरचा वापर करू शकतात. फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी शेतात मशागतीसाठी मिनी टिलर फायदेशीर ठरतात. तसे यांच्यामध्ये डिझेल इंजनचा वापर केलेला असतो व लहान इंजिन असते.

याशिवाय अनेक मिनी टिलर वीज आणि गॅसवर देखील चालतात. फळबागा तसेच भाजीपाला शेतीमध्ये अनेक मशागतीच्या कामांसाठी मिनी टिलरचा वापर करता येतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil