टेक्नोलाॅजी

Waaree Solar System: वारी कंपनीचे 3Kw सोलर सिस्टिम बसवा आणि 25 वर्षापर्यंत वीज बिलापासून मुक्तता मिळवा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

Waaree Solar System:- वाढत्या वीज बिलाची समस्या आणि विजेची टंचाई या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळण्याच्या  दृष्टिकोनातून सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत असून यातून  सोलर सिस्टम बसवण्यासाठी अनुदान देखील देण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या सोलर सिस्टम तुम्ही घराच्या छतावर बसवून सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करू शकतात व तुमची घरातील विजेची गरज भागवू शकता व एवढेच नाही तर तयार झालेली अतिरिक्त वीज विक्री करून तुम्ही पैसा देखील मिळवू शकतात.

जर आपण सोलर सिस्टमचा विचार केला तर बाजारामध्ये अनेक ब्रँड आज उपलब्ध आहेत व प्रत्येक कंपन्यांच्या सोलर सिस्टम चे वैशिष्ट्य आणि किमती देखील वेगवेगळ्या आहेत. याचा अनुषंगाने आपण या लेखांमध्ये वारी एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या सोलर सिस्टमबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

 वारी एनर्जीस लिमिटेड एक प्रसिद्ध ब्रँड

 सोलर उपकरणे निर्माण करणाऱ्या अनेक ब्रँड आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत व यामध्ये वारी एनर्जीस लिमिटेड हा एक प्रसिद्ध ब्रँड असून भारतातील सोलर उपकरणे तयार करणारे अनेक जुन्या कंपन्यांमधील ही एक कंपनी आहे.

या कंपनीचे सोलर उपकरणे एक विश्वासनीय असे मानले जातात व एवढेच नाही तर सोलर उपकरण निर्मिती क्षेत्रांमध्ये  ही कंपनी वेगाने प्रगती करत आहे. या कंपनीचे सोलर उपकरणे दुसऱ्या देशांमध्ये देखील निर्यात केले जातात. या कंपनीच्या 3Kw सोलर सिस्टम बद्दल महत्वाची माहिती आपण बघणार आहोत.

 वारी कंपनीचे 3Kw सोलर सिस्टमचे वैशिष्ट्ये

 जर तुमचे घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्येक दिवसाला 15 युनिट पर्यंत विजेची गरज असेल तर तुम्ही 3Kw सोलर सिस्टम इनस्टॉल करू शकता. तीन किलो वॅट सोलर सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक दिवसाला सौर ऊर्जेच्या माध्यमातून 15 युनिट विज मिळवू शकतात.

सोलर सिस्टम मध्ये तुम्ही वारी कंपनीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या पॉली क्रिस्टलाईन सोलर पॅनल जर वापरले तर तीन किलोवॅट पर्यंत क्षमता असलेले सोलर इन्वर्टर वापरणे गरजेचे असते. त्यासोबतच पावर बॅकअपसाठी सोलर बॅटरीची आवश्यकता देखील तुम्हाला भासते.

वारी कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पॉली क्रिस्टलाइन सोलर पॅनलचा वापर करून चांगल्या पद्धतीची सोलर सिस्टम इन्स्टॉल करू शकतात. पॉली क्रिस्टलाईन सोलर पॅनलची किंमत इतर सोलर पॅनलच्या तुलनेमध्ये कमी असते.

वारी कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या तीन किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल ची किंमत 95 हजार रुपये पर्यंत आहे. यामध्ये तुम्हाला 335 वॉटचे नऊ सोलर पॅनल इंस्टॉल करता येऊ शकतात व यावर तुम्हाला 25 वर्षाची वॉरंटी कंपनीच्या माध्यमातून दिली जाते. या सोलर सिस्टम मध्ये तुम्हाला डीसीचे रूपांतर एसीमध्ये करण्यासाठी सोलर इन्वर्टर देखील लागते.

कोणत्याही सोलर सिस्टममध्ये जास्त क्षमतेच्या सोलर इन्वर्टरचा वापर केला जातो.कारण जर भविष्यामध्ये सोलर सिस्टम वाढवली तर याचा फायदा होतो.

तीन किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टिम वापरण्याकरता लागणाऱ्या Waaree MPPT 3.5KVA solar PCU ची किंमत अंदाजे 41 हजार 950 रुपये आहे. आधुनिक तंत्रज्ञान असलेले सोलर इन्वर्टर असून यावर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी मिळते.

 वारी सोलर बॅटरीची किंमत किती असते?

 ऑफग्रीड सोलर सिस्टममध्ये बॅटरीचा वापर केला जातो. पावर बॅकअपच्या आवश्यकतेनुसार सोलर बॅटरीचा वापर हा सोलर सिस्टममध्ये केला जातो. जर आपण वारी कंपनीच्या सोलर बॅटरीची किंमत पाहिली तर ती…

1- वारी कंपनीच्या 200 Ah सोलर ट्यूबलर बॅटरीची किंमत 16500 आहे.

2- वारी कंपनीच्या 40 Ah सोलर ट्यूबलर बॅटरी ची किंमत 11900 आहे.

Ajay Patil