आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकरिता आता आधार कार्ड महत्त्वाचे आहे व हे आपल्याला सादर करावे लागते. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आता आधार क्रमांक व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
त्यामुळे आधार कार्डच्या संबंधित असलेली सगळी महत्त्वाची कामे म्हणजेच आधार अपडेट ठेवणे खूप गरजेचे असते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते व त्यासाठीचा आवश्यक ओटीपी हा त्या मोबाईल नंबर वर येत असतो.
त्यामुळे तुम्ही जर नवीन नंबर घेतला असेल आणि जुना बंद केला असेल किंवा मोबाईल नंबर हरवला असेल तर अशावेळी तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांक सोबत लिंक करणे गरजेचे आहे. तसेच बऱ्याचदा आपल्याला आपल्या आधार क्रमांक सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहिती नसते व हे देखील आपण घरबसल्या कमी वेळेत शोधू शकतो.
पद्धत वापरा आणि तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही हे शोधा
1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला UIDAI अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल व त्या ठिकाणी माय आधार विभागांमध्ये आधार सेवांवर क्लिक करावे लागेल.
2- या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफाय मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचा पर्याय मिळतो व त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
3- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता आधार आणि मोबाईल नंबर नमूद करावा जो तुम्हाला लिंक करता येईल असे वाटते व त्यानंतर कॅपच्या कोड भरावा आणि सबमिट करावे.
4- जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला एक नोटिफिकेशन पॉप अप मिळतो. यावर सदर नंबर आधीपासूनच आधारशी लिंक आहे असे त्यामध्ये नमूद केलेले असते.
5- परंतु जर सबमिट केले गेले तर याचा अर्थ सदर मोबाईल नंबर लिंक केलेला नाही.
अशा पद्धतीने करा मोबाईल नंबर अपडेट
1- तुम्हाला जर मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी किंवा आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर त्याकरता तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावे लागते.
2- महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाऊन करावे लागते.
3- या ठिकाणी तुम्हाला आधार दुरुस्ती फॉर्म दिला जातो व तो तुम्हाला भरावा लागतो व हा फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे नाव तसेच आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील भरणे गरजेचे असते.
4- त्यानंतर हा भरलेला फॉर्म आधार सेवा केंद्रामध्ये सादर करावा व तुमचा बायोमेट्रिक तपशील द्यावा.
5- किमान सात दिवसांमध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट होतो.त्यानंतर नवीन आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.
तुमच्या जवळचे आधार सेवा केंद्र अशा पद्धतीने शोधा
तुम्ही युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राची माहिती मिळू शकतात व ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला….
1- सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2- त्या ठिकाणी गेल्यानंतर माय आधार या विभागांमध्ये लोकेट एन एनरोलमेंट सेंटर इन भुवन आधार यावर क्लिक करावे लागेल.
3- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शहराचा पिन कोड किंवा शहराचे नाव टाकून शोधावे म्हणजे सर्च करावे लागेल.
4- या पद्धतीने तुम्ही सर्च केल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या सर्व आधार सेवा केंद्राची यादी तुमच्यासमोर येते.