Vikram Solar:- सध्या सौर ऊर्जा वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील देण्यात येत आहे. सौर ऊर्जा ही काळाची गरज असून येणाऱ्या कालावधीमध्ये सौर ऊर्जा वापराशिवाय पर्याय नाही.
शेतामध्ये देखील शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक पंप बसवता यावेत याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान कुसुम योजनेसारखी योजना राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून अनुदान देखील देण्यात येत आहे.
तसेच घरावर सौर पॅनल बसवून सौर ऊर्जेच्या वापर वाढावा आणि विज बिलापासून मुक्तता मिळावी या दृष्टिकोनातून देखील शासनाच्या अनेक योजना आहेत व या माध्यमातून सौर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देखील देण्यात येते.
वीज बिलाच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी बरेच नागरिक घरातील सर्व विद्युत उपकरणे सौर उर्जेवर चालावी त्याकरिता सोलर सिस्टम इन्स्टॉल करतात. कारण सोलर सिस्टिम बसवणे हे दीर्घकाळासाठी खूप फायद्याची ठरणारी बाब आहे.
यामध्ये तुम्ही एकदा पैशाची गुंतवणूक केली तर तुम्ही पंचवीस वर्षांपर्यंत अगदी मोफत वीज वापरू शकता. जर आपण अशा पद्धतीच्या सोलर सिस्टमचा विचार केला तर यामध्ये अनेक कंपन्या असून वेगवेगळ्या कंपन्यांच्या सोलर सिस्टमचे वेगवेगळे वैशिष्ट्ये व किंमत आहे.
या अनुषंगाने या लेखामध्ये आपण विक्रम सोलर कंपनीच्या ऑफ ग्रीड दोन किलोवॅट सोलर सिस्टमबद्दल माहिती घेणार आहोत. ही सोलर सिस्टम बसवण्यासाठी तुम्हाला एकूण किती खर्च येईल व किती सबसिडी मिळेल? याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.
घराकरिता कोणती सोलर सिस्टम राहील चांगली?
सोलर सिस्टममध्ये किलोवॅटनुसार वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये जर दोन किलोवॅटचे सोलर सिस्टम तुम्ही बसवली तर ती एका दिवसात आठ ते दहा युनिट वीज तयार करते. म्हणजेच तुम्ही घरातील विजेवर चालणारी बरीच उपकरणे या सौर सिस्टमच्या मदतीने चालवू शकतात.
दोन किलो वॉटची सोलर सिस्टम तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा अंगणात देखील बसवू शकतात. हे सोलर सिस्टम बसवण्यासाठी तुम्हाला बारा चौरस मीटर जागा लागते.
विक्रम सोलर ऑफ ग्रिट दोन किलोवॅट सोलर सिस्टम बसवण्यासाठी किती खर्च येईल?
विक्रम सोलर कंपनी ही भारतातील प्रसिद्ध कंपनी असून या कंपनीच्या दोन किलो वॅट ऑफ ग्रेड सोलर सिस्टम बसवण्याची एकूण किंमत अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये आहे. यामध्ये तुम्हाला आठ पॅनल्स तसेच दोन किलो वॅट सोलर इन्वर्टर,
चार सोलर बॅटरी, 40 एंपियर चार्ज कंट्रोलर आणि सोलर पॅनल स्टॅन्ड, डीसीडीबी, एसीडीबी, जीआय स्ट्रक्चर आणि कनेक्टर यासारखा खर्च देखील यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात
आलेल्या पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून तुम्ही या दोन किलो वॅट ऑफ ग्रेड सोलर सिस्टम बसवण्यासाठी अर्ज केला तर 60% पर्यंत सबसिडी मिळत आहे. म्हणजेच विक्रमच्या या दोन किलो वॅट सोलर साठी तुम्हाला जवळपास 78 हजार रुपये अनुदान मिळू शकते.