टेक्नोलाॅजी

2kW चा सोलर पॅनल बसवायचा प्लॅन आहे का? त्या अगोदर वाचा यावर घरातील कोणती उपकरणे तुम्ही चालवू शकाल?

Published by
Ajay Patil

सौर ऊर्जेचा वापर हा भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत व नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम सूर्यघर योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते.

या योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 2kW चा सोलर पॅनल बसवू शकतात.या सौर पॅनलच्या मदतीने तुम्ही दिवसाला आठ ते दहा युनिट्स वीज सहज निर्माण करू शकतात.

तुम्हाला देखील तुमच्या घरामध्ये हा छोटा 2kW चा सौर पॅनल बसवायचा असेल तर त्या माध्यमातून तयार विजेवर तुम्ही घरामधील कुठली विद्युत उपकरणे चालू शकतात याची माहिती देखील तुम्हाला असणे तितकेच गरजेचे आहे व त्याकरिता आपण याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.

2kW च्या सौर पॅनलच्या मदतीने तुम्ही घरातील कुठली विद्युत उपकरणे चालवू शकतात?

1- या सोलर पॅनलच्या मदतीने तुम्ही घराच्या लाईटची व्यवस्था पूर्णपणे चालवू शकतात.2kW च्या सोलर पॅनलच्या मदतीने तुम्ही घरातील आठ ते दहा एलईडी बल्ब, चार ते पाच ट्यूबलाइट्स आणि दोन ते तीन कुलर सहजपणे चालवू शकतात. यामुळे तुमच्या घरातील विजेचे बिल खूप कमी होईल.

2- एवढेच नाही तर तुम्ही घरातील टीव्ही, फॅन तसेच लॅपटॉप व मोबाईल चार्जर इत्यादी लहान उपकरणे देखील या सोलर पॅनलच्या माध्यमातून उत्तमरीत्या चालवू शकतात.2kW च्या सोलर सिस्टिमच्या मदतीने तुम्ही घरातील 32 इंच एलईडी टीव्ही, दोन ते तीन पंखे आणि एक ते दोन लॅपटॉप सहजपणे चालवू शकतात.

3- तुमच्या घरामध्ये 150 ते 200 लिटरचा छोटा फ्रिज असेल असेल तर तुम्ही या सोलर पॅनलच्या मदतीने तो तुम्हाला उत्तमरित्या चालवता येऊ शकतो.

4- हे सौर पॅनल घरामध्ये वाशिंग मशीन आणि वॉटर प्युरिफायर सारखी मध्यम  श्रेणीची उपकरणे देखील चालवण्यासाठी सक्षम आहेत.यामध्ये तुम्ही सहा ते सात किलो क्षमतेचे पूर्णपणे ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणि आठ ते दहा लिटर क्षमतेचे वॉटर प्युरिफायर चालवू शकतात.

5- एवढेच नाहीतर या सोलर पॅनलच्या मदतीने तुम्ही घरामध्ये एक टन क्षमतेचा एसी देखील सहजपणे चालवू शकतात.

2kW च्या सौर पॅनलवर तुम्ही सबसिडी मिळवू शकतात

तुम्हाला जर या सौर पॅनलवर पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून अनुदान घ्यायचे असेल तर तुम्हाला या योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल व तुमचा संपूर्ण तपशील भरून सबसिडीसाठी अर्ज करावा लागेल. यावर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 50 ते 60 टक्के पर्यंत सबसिडी मिळू शकते व तुम्ही तुमचा विज बिलाकरिता येणारा खर्च खूप कमी करू शकतात.

यावरून आपल्याला दिसून येते की घराच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी हा सौर पॅनल पुरेसा ठरतो व याच्या वापराने तुम्ही बिलापासून मुक्तता मिळवू शकतात.

Ajay Patil