Realme Air Buds 5 Series : बाजारात स्मार्टफोनप्रमाणे इयरबडची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच आता जर तुम्ही नवीन इयरबड खरेदी करू इच्छित असाल तर जरा इकडं लक्ष द्या. बाजारात रियलमीने आपले दोन शानदार इयरबड लाँच केले आहे.
विशेष म्हणजे हे इयरबड तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येईल. यात 40 तासांचा बॅटरी बॅकअप आणि धमाकेदार आवाज देण्यात आला आहे. इतकेच नाही तर हे तुम्हाला विविध रंगांमध्ये सहज खरेदी करता येईल. जाणून घ्या याचे फीचर्स आणि किंमत.
जाणून घ्या Realme Buds Air 5 सीरिज किंमत
Realme Buds Air 5 Pro कंपनीकडून Sunrise Beige आणि Astral Black कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. जे तुम्ही कंपनीची वेबसाईट Amazon, Flipkart आणि तुमच्या जवळच्या आघाडीच्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.
किमतीचा विचार केला तर Realme Buds Air 5 Pro ची भारतात किंमत 4,999 रुपये इतकी आहे, परंतु प्रास्ताविक ऑफर अंतर्गत ते तुम्हाला 4,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ग्राहकांसाठी 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
तर Realme Buds Air 5 डीप सी ब्लू आणि आर्क्टिक व्हाइट रंगांमध्ये लॉन्च केले आहे. किमतीचा विचार केला तर व्हॅनिला बड्स एअर 5 ची किंमत 3,699 रुपये असून परिचयात्मक ऑफर अंतर्गत ती 3,499 रुपयांना उपलब्ध असेल. त्याची विक्री 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार असून ते तुम्ही Realme.com, Flipkart आणि तुमच्या जवळच्या आघाडीच्या रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.
फीचर्स
आता Realme Buds Air 5 Pro पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IPX5 रेटिंगसह स्टेम डिझाइनसह येते. सेगमेंट-फर्स्ट कोएक्सियल ड्युअल ड्रायव्हर्ससह सुसज्ज असून ज्याला कंपनीकडून ‘रिअल बूस्ट ड्युअल ड्रायव्हर्स’ असे नाव देण्यात आले आहे.
30% कमी-फ्रिक्वेंसी बूस्ट आणि 200% उच्च-फ्रिक्वेंसी बूस्टसह 11mm बास ड्रायव्हर्स उपलब्ध आहे. हे 990kbpx LDAC वायरलेस एचडी ट्रान्समिशन, हाय-रिस ऑडिओ प्रमाणीकरण आणि 360-डिग्री स्पेशियल ऑडिओ सपोर्टला सपोर्ट करते.
Realme ने Buds Air 5 Pro मध्ये प्रगत फीचर्स देण्यात आली आहे. यात 50dB पर्यंत ANC आणि 6-माईक कॉल नॉइझ कॅन्सलेशनचा समावेश असून यात ड्युअल डिव्हाइस कनेक्शन 2.0, ब्लूटूथ 5.3, 40ms सुपर लो लेटन्सी आणि इतर फीचर्स दिली आहेत. या कंपनीचा दावा आहे की बड्स एअर 5 प्रो एका चार्जवर 40 तासांपर्यंत प्लेबॅक देईल. हे 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 7 तासांचा प्लेबॅक देते.
त्याशिवाय व्हॅनिला बड्स एअर 5 प्रो व्हेरियंट प्रमाणेच ध्वनी रद्दीकरण फीचरसह सुसज्ज असून यात 50dB ANC आणि 6-माईक कॉल नॉइझ कॅन्सलेशनचा समावेश केला आहे. कंपनीच्या या इयरबड्समध्ये 45ms सुपर लो लेटन्सीसह प्रगत 12.4mm मेगा टायटनाइजिंग ड्रायव्हर सेटअप दिला आहे. एका चार्जवर 38 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देत आहे.