Realme GT 7 Pro Racing Edition तब्बल 6,500mAh बॅटरी सह देणार OnePlus आणि iQOO ला फाईट

Published on -

नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला होता.नवीन रेसिंग एडिशन मॉडेलमध्ये हार्डवेअर जवळपास सारखेच आहे, मात्र, कॅमेरा आणि इतर काही फीचर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत कधी उपलब्ध होईल, तसेच त्याच्या किंमतीबाबत अधिक जाणून घेऊया.

Realme GT 7 Pro Racing Edition हा वेगवेगळ्या स्टोरेज आणि रॅम व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.त्याच्या चीनी बाजारातील किंमती पुढीलप्रमाणे आहेत— 12GB + 256GB व्हेरिएंट साठी CNY 3,099 (अंदाजे ₹36,896), 16GB + 256GB व्हेरिएंट साठी CNY 3,399 (अंदाजे ₹42,105), 16GB + 512GB व्हेरिएंट साठी CNY 3,699 (अंदाजे ₹43,406) आणि 16GB + 1TB व्हेरिएंट साठी CNY 3,999 (अंदाजे ₹47,746). हा फोन नेपच्यून एक्सप्लोरर (ब्लू) आणि स्टार ट्रेल टायटॅनियम या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7 Pro Racing Edition हा एक हाय-एंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्ससह येतो.यामध्ये 6.78-इंचाचा BOE S2 OLED डिस्प्ले असून त्याला मायक्रो-क्वाड-वक्र डिझाइन आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 6,000 nits पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्ट आहे, जे उत्तम व्हिज्युअल अनुभव प्रदान करतात. फोनमध्ये नवीनतम Snapdragon 8 Elite प्रोसेसर असून LPDDR5x RAM आणि UFS 4.1 स्टोरेज तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.यामुळे हा फोन अत्यंत वेगवान आणि स्मूथ परफॉर्मन्स देतो.

थर्मल व्यवस्थापनासाठी, Realme GT 7 Pro Racing Edition मध्ये 11,480mm² ड्युअल-चेंबर व्हेपर कूलिंग सिस्टम आहे, जी फोनला गरम होण्यापासून वाचवते.हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Realme UI 6 वर चालतो आणि त्याला IP68/69 रेटिंगसह ॲल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे,जी फोनला अधिक टिकाऊ बनवते.

कॅमेरा सेटअप पाहता, हा फोन 50MP Sony IMX896 प्राइमरी कॅमेरा (OIS सपोर्टसह) आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा (OV08D10) सह सुसज्ज आहे. OIS तंत्रज्ञानामुळे लो-लाइट फोटोग्राफी आणि व्हिडिओ स्टेबलिटी सुधारते. सेल्फीसाठी, यात 16MP Samsung S5K3P9 फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी बद्दल बोलायचं झाल्यास हा स्मार्टफोन 6,500mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येतो, जी एकाच चार्जमध्ये दिवसभर टिकते. याशिवाय, यात 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, जो काही मिनिटांत फोन पूर्ण चार्ज करू शकतो.

इतर फीचर्समध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर (Dolby Atmos सपोर्ट), मोठी X-अक्ष रेषीय मोटर, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, ड्युअल-फ्रिक्वेंसी GPS, NFC, IR ब्लास्टर आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.

भारतातील मागणी पाहता, येत्या महिनाभरात हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात हा फोन ₹40,000 ते ₹50,000 च्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतो. हा स्मार्टफोन OnePlus 12, iQOO 12 आणि Samsung Galaxy S24 सारख्या फ्लॅगशिप फोनना थेट स्पर्धा देऊ शकतो.

Realme GT 7 Pro Racing Edition हा एक फ्लॅगशिप स्तरावरील स्मार्टफोन आहे, जो दमदार प्रोसेसर, उत्कृष्ट डिस्प्ले आणि शक्तिशाली कॅमेरासह सुसज्ज आहे.त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहता, हा फोन गेमर्स, फोटोग्राफी प्रेमी आणि हाय-एंड युजर्ससाठी योग्य पर्याय ठरू शकतो.जर Realme ने योग्य किंमतीत हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला, तर तो OnePlus आणि iQOO सारख्या ब्रँड्सना जबरदस्त स्पर्धा देऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe