Realme Narzo N53 : ‘या’ फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी, किंमत आहे फक्त 8999 रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme Narzo N53 : भारतीय बाजारपेठेत Realme च्या स्मार्टफोन्सला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कंपनी हीच मागणी लक्षात घेऊन सतत नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल करत असते. यापैकी काहींच्या किमती जास्त असतात.

अशातच जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तरुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. आता तुम्ही कंपनीचा Realme Narzo N53 हा फोन अवघ्या 8999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीनेच ऑफर जाहीर केली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

जाणून घ्या फोनची किंमत

नुकत्याच आपल्या एका ट्विटमध्ये, चीनी स्मार्टफोन कंपनी Realme ने अशी घोषणा केली आहे की Narzo N53 हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी श्रेणीत देशातील नंबर 1 सर्वात जास्त विक्री होणारा स्मार्टफोन बनला आहे. याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे तसेच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत 10,999 रुपये इतकी आहे.

जाणून घ्या Realme Narzo N53 ची फीचर्स

फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर Realme Narzo N53 मध्ये HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.74-इंचाचा IPS LCD पॅनेल दाखवतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 450 nits पीक ब्राइटनेस आणि 180 Hz टच सॅम्पलिंग रेटसाठी समर्थन देण्यात आले आहे. हा फोन Unisoc T612 प्रोसेसरने सुसज्ज असून या फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये कंपनीने व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मिळेल मजबूत बॅटरी आणि कॅमेरा

Realme Narzo N53 हा शानदार फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करत आहे. कंपनीचा हा फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. तर फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 8-मेगापिक्सेल सेल्फी शूटर दिले आहे. हा फोन फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.