Realmi Nio 7 Smartphone:- रियलमी या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने नुकताच चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Realme Neo 7 हा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून या फोनचा अधिकृत टीझर कंपनीच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे व त्यामुळे या स्मार्टफोन विषयी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.
कंपनी हा स्मार्टफोन ११ डिसेंबरला चिनी बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत असून भारतीय बाजारपेठेत मात्र हा कधी लॉन्च होईल याबाबत कुठलीही अपडेट अजून पर्यंत मात्र समोर आलेली नाही. परंतु टीझर पाहून लक्षात येते की हा स्मार्टफोन बॅटरीची क्षमता तसेच त्याचा प्रोसेसर आणि इतर फीचर्स मध्ये दमदार असा स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे हा रियलमी जीटी निओ 6 पेक्षा खूप वेगळा असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅप ड्रॅगन मीडिया टेक डायमेन्शन 9300+ प्रोसेसर आणि 7000 mAh क्षमतेची टायटन बॅटरी देण्यात आली आहे
व तसेच यामध्ये PS3 अग्नीरोधक डिझाईन आणि 38 सुरक्षा संरक्षण स्तरांसह बाजारात येणार आहे. या फोनची जाडी 8.5 मीमी असण्याची शक्यता आहे व गेमर्स साठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
Realmi Neo 7 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
नवीन रियलमी निओ 7 मध्ये 1.5k रिझोल्युशनसह OLED डिस्प्ले येऊ शकतो. तसेच चीनच्या 3C सर्टिफिकेशन वेबसाईट नुसार बघितले तर हा स्मार्टफोन 80W वायर्ड SuperVOOC चार्जिंग सपोर्ट येईल. तसेच या स्मार्टफोनचे धूर आणि पाणी यापासून संरक्षण व्हावे याकरिता याला IP68 आणि IP69 रेटिंग मिळू शकते.
किती असू शकते किंमत?
रियलमिने चीनमध्ये रियलमी निओ 7 ची प्रि ऑर्डर देखील सुरू केलेली आहे. चीनमध्ये ई-कॉमर्स प्लेटफॉर्म आणि ई स्टोरवर सध्या हा स्मार्टफोन विक्रीकरिता उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची जर भारतीय बाजारपेठेतील किंमत बघितली तर ती 29 हजार 100 रुपये असण्याची शक्यता आहे.