Redmi Note 12 5G : आकर्षक ऑफर! भरघोस सवलतीसह स्वस्तात खरेदी करा ‘हा’ शक्तिशाली 5G फोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 12 5G : आता तुम्हाला अनेकांकडे 5G स्मार्टफोन पाहायला मिळत असतील. कंपन्या आता आपले एकापेक्षा एक जबरदस्त असे 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. परंतु याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका.

कारण आता तुम्ही रेडमी Note 12 5G फोन सवलतीसह खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 23,999 रुपये आहे. परंतु तुम्ही तो कंपनीच्या वेबसाइटवरून 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला इतर सवलतींचा लाभ घेता येईल.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीकडून आपल्या या शानदार स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात येत आहे. फोनचा हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या डिस्प्लेची ब्राइटनेस पातळी 1200 nits इतकी आहे.

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5 जीबी पर्यंत व्हर्चुअल रॅम देखील दिली जात आहे. त्यामुळे आता तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या फोनची मेमरी 1TB पर्यंत वाढवू शकता. तसेच यात फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळतील.

यात 48-मेगापिक्सेल मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स तसेच 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, कंपनी यात सेल्फीसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. कंपनीचा हा जबरदस्त फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Adreno 619 GPU सह Snapdragon 4 Gen 1 चिपसेट पाहायला मिळू शकतो. तसेच साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असणारा हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करतो. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला यात 2 वर्षांसाठी OS आणि 4 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट मिळेल.