Redmi Note 12 Pro 5G : 200MP कॅमेरा असणाऱ्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे हजारोंची सवलत, ऑफर मर्यादित कालावधीसाठी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 12 Pro 5G : बाजारात रेडमीचे स्मार्टफोन आपल्याला सतत धुमाकूळ घालताना दिसतात. हे फोन इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनला कडवी टक्करही देतात. कंपनीच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Redmi Note 12 Pro 5G हा फोन लाँच केला होता.

जो आता तृम्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर मिळत आह/ लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या. कारण मर्यादित कालावधीसाठी ऑफर असणार आहे. जाणून घ्या किंमत आणि ऑफर.

इतक्या स्वस्तात खरेदी करता येईल फोन

अशी शानदार ऑफर रेडमीच्या Redmi Note 12 Pro 5G च्या बेस वेरिएंटवर उपलब्ध आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवर २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 33,999 रुपये इतकी आहे, म्हणजेच तो 4000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह तुम्हाला तो खरेदी करता येईल.

तसेच आता तुम्हाला बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन 3000 रुपयांपर्यंत सवलत यावर मिळवता येईल, ज्यामुळे या फोनची किंमत 26,999 रुपये इतकी होईल. म्हणजेच मूळ किमतीपेक्षा 7,000 रुपयांपर्यंत कमी किमतीत फोन खरेदी करता येईल.

समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर, तुम्ही 26,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळवू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची किंमत ही तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या फोनची खासियत

तुम्हाला कंपनीचा हा फोन आर्क्टिक व्हाइट, ऑब्सिडियन ब्लॅक आणि आइसबर्ग ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Gorilla Glass 5 संरक्षण, 120 Hz रिफ्रेश रेट आणि HDR10 सपोर्टसह येईल. हा फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरने सुसज्ज असून यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज पाहायला मिळेल.

मिळेल 200MP कॅमेरा

वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये तीन मागील कॅमेरे दिले आहेत, ज्यात 200-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स यांचा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात 4980 mAh बॅटरी आहे. फोन पूर्णपणे चार्ज होण्यासाठी केवळ 19 मिनिटे लागतात, असा दावा कंपनीने केला आहे.