Redmi Note 12 Pro 5G : शक्तिशाली कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरसह लाँच झाला Redmi नवीन फोन, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Note 12 Pro 5G : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा इकडं लक्ष द्या. कारण आता रेडमीने आपला नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Redmi Note 12 Pro 5G चा नवीन प्रकार आहे.

या फोनमध्ये कंपनीने 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय यामध्ये तुम्हाला 50MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. जो तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन वनप्लसला टक्कर देईल.

कंपनीचा हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह तुम्हाला खरेदी करता येईल. यामध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर दिला आहे. कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो. जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत.

जाणून घ्या फीचर्स

सर्वात महत्त्वाचे म्हणजे Redmi Note 12 Pro 5G हा स्मार्टफोन कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला Redmi Note 12 5G आणि Redmi Note 12 Pro 5G सोबत लॉन्च केला होता, हा फोन 6.67-इंचाच्या फुल एचडी AMOLED डिस्प्लेसह येईल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनच्या स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे.

कंपनीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरवर काम करेल. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून त्याची मुख्य लेन्स 50MP इतकी आहे.

तसेच या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध मिळतील. या फोनच्या मध्यभागी कंपनीकडून 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 5000mAh बॅटरी मिळत आहे, जी 67W चार्जिंगला समर्थन देते.

किंमत

कंपनीचा हा स्मार्टफोन 6GB RAM 128GB स्टोरेज, 8GB RAM 128GB स्टोरेज आणि 8GB RAM 256GB स्टोरेजमध्ये खरेदी करता येत होता. परंतु आता कंपनीकडून त्याचा 12GB रॅम 256GB स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च करण्यात आला आहे. किमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये इतकी आहे, जो तुम्ही Mi.com वरून सहज खरेदी करू शकता.

इतकेच नाही तर कंपनीचा हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरूनही खरेदी करू शकता. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. हा फोन फ्रॉस्टेड ब्लू, स्टारडस्ट पर्पल आणि अॅनॉक्सी ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.