मोठी बातमी ! iPhone 14 च्या किमतीत मोठी कपात, फक्त एवढे पैसे भरून खरेदी करता येणार आयफोन 14, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 Latest Price : नवीन वर्षाचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशातच आता नवीन iPhone घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर अँपलचा आयफोन हा एक असा स्मार्टफोन आहे ज्याचा हेवा प्रत्येकालाच आहे. प्रत्येकालाच आपल्याकडे आयफोन असावा असे वाटते. मात्र अनेकांना अधिकच्या किमतीमुळे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.

याची किंमत सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेरची आहे. यामुळे इच्छा असूनही अनेक लोकांना आयफोन खरेदी करता येत नाही. मात्र आता आयफोन 14 वर मोठी सूट मिळत आहे. परिणामी आता हा फोन सर्वसामान्यांना देखील खरेदी करता येणार आहे. याच्या किमतीत कंपनीने मोठी कपात केली आहे.

शिवाय अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या इ कॉमर्स साईट आयफोन 14 वर मोठी सूट देत आहेत. यामुळे आता हा फोन त्याच्या मुळ किंमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्यांचा बजेट हा खूपच कमी आहे त्यांना देखील आता हा फोन खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्टवर आयफोन 14 वर मिळतेय बंपर सूट

सध्या फ्लिपकार्टवर 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष सेल सुरू आहे. या सेलमध्ये आयफोनवर देखील मोठी डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. दरम्यान याच सेलचा फायदा घेऊन आता आयफोन 14 स्वस्तात खरेदी करता येणार आहे. खरे तर आयफोन 15 बाजारात आल्यानंतर आयफोन 14 ची किंमत दहा हजाराने कमी करण्यात आली.

आयफोन 14 हा 79,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. आता मात्र या फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. हा फोन फ्लिपकार्ट मध्ये सुरू असलेल्या सर्व ऑफरचा लाभ घेतल्यानंतर 38 हजार 199 रुपयाला खरेदी करता येणार आहे. यासाठी मात्र ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा तसेच क्रेडिट कार्डच्या सवलतीचा देखील लाभ घ्यावा लागणार आहे.

अमेझॉनवर पण iPhone 14 स्वस्तात मिळतोय

याशिवाय अमेझॉन वर देखील हा फोन खूपच स्वस्तात मिळत आहे. 79,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झालेला हा फोन अमेझॉन वर 58 हजार 999 ला उपलब्ध आहे. तसेच या फोनसाठी एक्सचेंज ऑफर देखील सुरू आहे. एक्सचेंज ऑफरवर तब्बल 22500 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. तसेच इतरही अनेक ऑफर्स आणि सवलती अमेझॉन वर सुरु आहेत. जर ग्राहकांनी ॲमेझॉन वर सुरू असलेल्या सर्व सवलतींचा आणि ऑफरचा लाभ घेतला तर त्यांना हा फोन फक्त 36 हजार 499 रुपयांना खरेदी करता येणार आहे.