Reliance Jio : जिओचा मोठा निर्णय! करोडो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या..

Pragati
Published:
Reliance Jio

Reliance Jio : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. ग्राहकांच्या बजेटनुसार कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत असते. कंपनी सतत इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते.

कंपनीने काही दिवसांपूर्वी आपली 5G सेवा सुरु केली आहे. ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होत आहे. जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आपले प्लॅन महाग करणार नाही

याबाबत मॅथ्यू पुढे असे म्हणाले की, देशातील सध्या 20 दशलक्ष म्हणजेच 20 कोटीपेक्षा जास्त वापरकर्त्यांना 2G चा चांगला अनुभव मिळत नाही आणि 2G मोफत दूरसंचार उद्योगासाठी वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत 5G सेवा देणे खूप गरजेचे आहे. मॅथ्यूच्या मतानुसार, कंपनी भारतीय वापरकर्त्यांना उत्तम अनुभव देऊ इच्छित आहे.

ARPU मध्ये सुधारणा

दूरसंचार कंपनीचे आर्थिक आरोग्य मोजण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ARPU अर्थात प्रति वापरकर्ता सरासरी महसूल होय. या तिमाहीच्या शेवटी, Jio चा ARPU 181.7 रुपये इतका होता, जो मागील तिमाहीपेक्षा चांगला असून कंपनीचे प्रतिस्पर्धी Airtel आणि Vodafone-Idea टॅरिफ महाग करत आहेत आणि त्यांचे ARPU आणखी वाढवण्यासाठी टेरिफ वाढवण्याचा प्लॅन आखत आहेत. या कंपन्यांचे मत आहे की उद्योगाचा सध्याचा खर्च 5G विस्तारासह ऑपरेटरच्या मूलभूत गरजा आवश्यक प्रमाणात पूर्ण करू शकत नाही.

वोडाफोन-आयडियाच्या वाढल्या समस्या

याबाबत आता भारती एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल असे म्हणाले, ‘आम्हाला उद्योगाचे चांगले आर्थिक आरोग्य हवे असून हे तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी ARPU वाढेल.’ ते पुढे म्हणाले की, यावेळी एआरपीयू कमीत कमी 300 रुपये असावा.

या वर्षाच्या पहिल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी एअरटेलचा ARPU 200 रुपये होता. इतकेच नाही तर कर्जबाजारी व्होडाफोन-आयडियाला या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 142 रुपयांच्या एआरपीयूवर समाधान मानावे लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe