Reliance Jio Plan : जिओचा पैसा वसूल प्लॅन! फक्त एकदाच रिचार्ज करा आणि मिळवा 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio Plan : प्रत्येकाला फोन रिचार्ज करण्याचे टेन्शन असते. अनेकांना वार्षिक रिचार्जचा प्लॅन घेता येत नाही, त्यामुळे काही रिचार्ज प्लॅन्स असे आहेत ज्यांची वैधता 3 महिने एक महिना किंवा त्यापेक्षा कमी असते. असाच एक दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा रिचार्ज प्लॅन आहे. जो 3 महिन्यांच्या वैधतेसह तुम्हाला खरेदी करता येईल.

विशेष म्हणजे कंपनीच्या या शानदार रिचार्ज प्लॅनची किंमतही तुमच्या बजेटमध्ये आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत कमी आहे परंतु फायदे बरेच आहेत. यामध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि डेटासोबत Jio TV, Jio Security, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. इतर टेलिकॉम कंपन्यांना हा प्लॅन टक्कर देतो. जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल सविस्तर.

रिलायन्स जिओचा 719 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या या शानदार रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 जीबी डेटा देण्यात येत आहे, अशा प्रकारे ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 168 जीबी डेटा वापरू शकतात. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील देण्यात येत आहे.

कंपनीचा हा भन्नाट प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येत आहे, म्हणजेच तुम्ही जवळपास 3 महिन्यांसाठी या प्लॅनचा वापर करू शकता. तसेच ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जाताहेत. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Security, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात येत आहे.

रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

वैधतेबद्दल बोलायचे झाले तर रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या शानदार प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही एकूण 56 जीबी डेटाचा वापर करू शकता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली गेली आहे. तसेच दररोज 100 एसएमएसची सुविधाही कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Security, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.