रिलायन्स जिओची ग्राहकांना मोठी भेट, फक्त 219 रुपयात मिळणार दिवसाला 3 जीबी डेटा, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर, रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे प्लॅन लाँच केले जात असतात. कंपनी ग्राहकांना वेगवेगळे स्वस्त प्लान ऑफर करत असते. दरम्यान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे.

हा स्वस्त प्लॅन जिओच्या ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण की या प्लॅनमधून ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची किंमत फक्त आणि फक्त 219 रुपये एवढी आहे.

या रिलायन्स जिओच्या प्लॅन मधून ग्राहकांना दिवसाला 3 जीबी डेटा मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण रिलायन्स जिओकडून ऑफर केल्या जाणाऱ्या या 219 रुपयांच्या प्लॅनची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे 219 रुपयांचा प्लान

मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ कडून 219 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 3 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 14 दिवसांची असते. या चौदा दिवसांच्या काळासाठी ग्राहकांना दिवसाला तीन जीबी अशा तऱ्हेने 42 जीबी डेटा उपलब्ध होतो. विशेष म्हणजे या प्लॅन सोबत 25 रुपयांचे व्हाउचर देखील मिळते.

या व्हाउचरचा उपयोग करून ग्राहकांना दोन जीबी अतिरिक्त डेटा मिळत असतो. सोबतच या प्लॅन बरोबर ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा उपलब्ध होत असते. म्हणजेच या प्लॅनने रिचार्ज केल्यानंतर 14 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय कंपनीकडून 399 रुपयाचा देखील रिचार्ज ऑफर केला जातो.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये दिवसाला 3 जीबी डेटा मिळतो. शिवाय 61 रुपयांचे व्हाउचर देखील दिले जाते. याचा वापर करून ग्राहकांना सहा जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. शिवाय या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सवलत मिळते.