Samsung Galaxy : धुमाकूळ घालायला येतोय सॅमसंगचा स्वस्तात मस्त फोन, “या” स्मार्टफोन्सना देणार टक्कर

Samsung Galaxy : जगातील आघाडीची मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच भारतीय बाजारपेठेत एक नवीन डिव्हाइस आणत आहे. विशेष बाब म्हणजे हा स्मार्टफोन अतिशय परवडण्याऱ्या दारात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लॉन्च होणाऱ्या या फोनचे नाव Samsung Galaxy M04 असे असणार आहे. या फोनसंदर्भातील काही फोटो देखील व्हायरल होत आहेत. फोटोसह पोस्टरमध्ये फोनची किंमत देखील समोर आली आहे. चला जाणून घेऊया फोनबद्दल…

सॅमसंगचे नवीन आणि स्वस्त Samsung Galaxy M04 डिव्हाइस Realme च्या C सीरीजसह या श्रेणीतील इतर स्मार्टफोन्सना टक्कर देऊ शकते. यासोबतच सॅमसंगच्या Galaxy M04 फोनची इमेज पाहता त्याची रचना आणि काही फीचर्सही समजत आहेत.

Advertisement

samsung galaxy m04 to launch soon may come with 4gb ram and 5000mah battery  check features here sbh | Samsung Galaxy M04 में होंगे 4GB रैम और 5000mAh  बैटरी जैसे फीचर्स, जल्द

Samsung Galaxy M04 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M04 फोनच्या समोर आलेल्या फोटोमध्ये हा फोन मिंट ग्रीन कलरमध्ये येणार आहे. हे स्पष्टपणे दिसत आहे की या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमचे फीचर देखील दिले जाऊ शकते. फोनमध्ये रॅमसोबत एक्सपांडेबल रॅम सपोर्ट उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

फोनच्या लॉन्चची तारीख अद्याप समोर आलेली नसली तरी गुगल प्ले कन्सोल लिस्टमध्ये हा फोन दिसला आहे. हा फोन M045F/DS (ड्युअल सिम) मॉडेल नंबरसह आला आहे.

Samsung Galaxy (2)

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M04 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले दिला जाऊ शकतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये Helio G35 SoC प्रोसेसर असेल.

Advertisement

फोन 3GB RAM तसेच इतर RAM मॉडेलसह येऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 आधारित One UI वर चालेल. त्याच वेळी, चांगल्या ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU मिळू शकतो.