Samsung Galaxy F34 5G : सॅमसंगच्या शक्तिशाली 5G फोनची भारतात झाली एन्ट्री, स्वस्तात मिळेल दोन दिवस टिकणारी बॅटरी अन् 50MP कॅमेरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy F34 5G : देशातील सर्वात लोकप्रिय टेक कंपनी सॅमसंग अनेक दिवसांपासून Galaxy F34 5G या स्मार्टफोनवर काम करत होती. अखेर कंपनीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे.

आपल्या नवीन ग्राहकांसाठी कंपनीने नवीन स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

कंपनीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि नवीनतम Android आवृत्तीसह कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy F34 5G ची किंमत आणि त्याची फीचर्स.

किंमत

सॅमसंगकडून नवीन स्मार्टफोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या स्टोरेजनुसार किमतीचा विचार केला तर 6GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. तर फोनच्या 8GB रॅम 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक आणि ग्रीन अशा दोन रंग पर्यायांमध्ये फ्लिपकार्ट, सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि इतर ऑफलाइन रिटेल स्टोअरवरून खरेदी करता येईल.

फीचर्स

Samsung Galaxy F34 5G ला 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येत आहे. हे पॅनल 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करत असून याच्या स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे. यात Exynos 1280 प्रोसेसर आहे.

फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायात खरेदी करता येईल. त्याशिवाय यात स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिला आहे. फोनमध्ये 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2MP डेप्थ सेन्सर आणि फोनच्या फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

हा फोन Android 13 वर आधारित OneUI 5.1 वर काम करेल. 6000mAh बॅटरी पाहायला मिळेल. जी 25W चार्जिंगला समर्थन देते. वापरकर्त्यांना यात 4G LTE, ब्लूटूथ 5.2, ड्युअल बँड वाय-फाय आणि NFC सपोर्ट मिळेल.