Samsung Galaxy F54 5G : मस्तच.. लॉन्चपूर्वी बुक केला सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फोन तर होणार हजारो रुपयांची बचत, काय आहे ऑफर? पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy F54 5G : लवकरच सॅमसंग या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीचा Samsung Galaxy F54 5G हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. जर तुम्ही हा फोन स्वस्तात करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. अशी संधी तुम्हाला फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

जर तुम्ही हा फोन लॉन्चपूर्वी बुक केला तर तुम्हाला यावर 2000 रुपयांची सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. Samsung Galaxy F54 5G हा फोन प्री-रिझर्व्हसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. काय आहे ऑफर? जाणून घ्या.

प्री-रिझर्व्ह पास उपलब्ध

मागील सर्व सॅमसंग एफ सीरीज स्मार्टफोन्सप्रमाणे हा फोनदेखील फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. भारतात लॉन्च होण्यापूर्वी, Galaxy F54 5G हा आता Flipkart वर प्री-रिझर्व्हसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सध्या प्री-रिझर्व्ह पास आता फ्लिपकार्टवर 999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून तो खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना प्री-ऑर्डर दरम्यान एकूण 2,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. ही खरेदी काही विशेष प्री-ऑर्डर ऑफर अनलॉक करेल. प्री-रिझर्व्ह पासमुळे हा फोन खरेदी करण्यास सक्षम असण्याची हमी देतो. प्री-ऑर्डरच्या दिवशी, वापरकर्ते फ्लिपकार्टला सहज भेट देऊ शकतात.

असे असतील स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

Galaxy F54 5G मध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले दिला आहे जो फुल HD+ रिझोल्यूशन देतो. या फोनच्या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा थर दिला जाण्याची शक्यता आहे, जे फोनला ओरखडे तसेच पाण्याच्या थेंबांपासून संरक्षण करू शकते.

यामध्ये Exynos 1380 SoC असल्याचे म्हटले जात आहे, जे 5G कनेक्टिव्हिटी सक्षम करते. यात 6000mAh बॅटरी आहे. याशिवाय, हा फोन 25W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. या फोनचे वजन एकूण 199 ग्रॅम असल्याची शक्यता आहे. नवीनतम Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित One UI 5.1 वर चालू शकतो.

कंपनीकडून आपल्या आगामी फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅशसह 108MP रीअर कॅमेरा देण्याची शक्यता आहे. तसेच सेल्फी घेण्यासाठी या फोनमध्ये 32MP कॅमेरा असेल.