टेक्नोलाॅजी

Samsung Galaxy F54 5G : 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह बाजारात लॉन्च झाला सॅमसंगचा शक्तिशाली फोन, किंमत आहे फक्त..

Published by
Ahmednagarlive24 Office

Samsung Galaxy F54 5G : सॅमसंग या स्मार्टफोन निर्माता कंपनीने आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. अनेक दिवसांपासून कंपनी Samsung Galaxy F54 5G या फोनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन कंपनीकडून लाँच करण्यात आला आहे.

दरम्यान या फोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे. तसेच यात जबरदस्त प्रोसेसरही देण्यात येणार आहे. कंपनीकडून फोनच्या स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटिंग वापरण्यात आले आहे.

हा फोन 6000mAh बॅटरीवर काम करेल आणि त्याला चार्ज करण्यासाठी 25W फास्ट चार्जिंग कंपनीकडून दिली आहे. ही चार्जिंग क्षमता इतर ब्रँडपेक्षा थोडी कमी असण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध होणार नाही, त्यामुळे वापरकर्त्यांना चार्जर स्वतंत्रपणे विकत घ्यावा लागणार आहे किंवा ते त्यांच्या कोणत्याही जुन्या चार्जरने चार्ज करू शकतात.

जाणून घ्या किंमत

कंपनीकडून आगामी स्मार्टफोन 27,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केला आहे. यामध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज दिले जात आहे. हा फोन फ्लिपकार्टवर दुपारी ३ वाजल्यापासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहे.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy F54 मध्ये 6.7-इंच स्क्रीन असून जी AMOLED पॅनेलसह येते. यात 120Hz रिफ्रेश दर मिळेल, जे स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव सुधारण्यासाठी काम करेल. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटिंग वापरले आहे.

मिळणार जबरदस्त प्रोसेसर

आगामी फोनमध्ये इन-हाउस चिपसेट Exynos 1380 वापरला आहे. Samsung Galaxy A34 हा प्रोसेसर आधीच लॉन्च करण्यात आला आहे. Samsung चा हा नवीनतम 5G स्मार्टफोन Android 13 OS वर काम करेल आणि याबाबत कंपनीने असे सांगितले आहे की ते 4 वर्षांसाठी Android OS अपग्रेड करेल आणि 5 वर्षांसाठी सुरक्षा पॅच अपडेट करू शकतो.

कॅमेरा

Samsung Galaxy F54 मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108MP चा प्राथमिक कॅमेरा असून जो OIS सपोर्टसह येतो. यामध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळेल तसेच तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Ahmednagarlive24 Office