Samsung Galaxy F54 5G : Samsung चा 108MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन 3500 रुपयांनी झाला स्वस्त, मिळतेय 28 हजारांपर्यंत सूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy F54 5G : सॅमसंग सतत भारतीय बाजारात नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. विशेष म्हणजे कंपनीच्या या फोनला खूप मागणीही असते. काही फोन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Samsung Galaxy F54 5G हा फोन लाँच केला होता. जो आता तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी शानदार संधी तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर मिळत आहे. लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

जाणून घ्या बँक ऑफर

कंपनीकडून Samsung Galaxy F54 5G फोन एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे. कंपनीचा हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. परंतु तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करू शकता.

समजा तुम्ही PNB बँक क्रेडिट कार्डने खरेदी करून तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. तसेच तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी केला तर तुम्हाला रु.2000 ची अतिरिक्त सवलत मिळेल. समजा जर तुम्हाला बँकेच्या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाला तर तुम्हाला 3500 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते, ज्यामुळे फोनची किंमत 26,499 रुपये असणार आहे.

इतकेच नाही तर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर, तुम्ही 28,200 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे.

जाणून घ्या Samsung Galaxy F54 5G ची खासियत

कंपनीच्या या शानदार स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह येत आहे. या डिस्प्लेला 120 Hz चा रिफ्रेश दर मिळतो. तर फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेल आणि 2-मेगापिक्सेलच्या दोन इतर कॅमेरा सेन्सरसह तीन मागील कॅमेरे दिले आहेत. शिवाय या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तर या फोनमध्ये टाइप-सी पोर्टसह 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.