Samsung Galaxy Z Flip 4 : त्वरा करा! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय हा स्मार्टफोन, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy Z Flip 4 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि तुमचे स्मार्टफोन खरेदीचे बजेट कमी आहे. तर काळजी करू नका आता तुम्ही सर्वात लोकप्रिय कंपनीचा स्मार्टफोन अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

होय आता तुम्ही Samsung Galaxy Z Flip 4 हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 89,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत 41,390 रुपयांनी कमी करू शकता. तसेच तुम्ही 32,000 रुपयांचे Galaxy Watch 4 फक्त 3,000 रुपयांत खरेदी करू शकता.

जाणून घ्या Galaxy Z Flip 4 वर मिळणारी ऑफर

तसेच बँक ऑफरमध्ये तुम्हाला या स्मार्टफोनवर 7 हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळेल. संपूर्ण एक्सचेंज बोनस आणि बँक सवलतीसह, सॅमसंगचा हा स्मार्टफोन तुम्ही 89,999 – 48390 रुपये म्हणजेच 41,600 रुपयांना तुम्ही सहज खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.

Galaxy Z Flip 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

सॅमसंगचा हा स्मार्टफोनचा मुख्य डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. हा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले 2460×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह फुल एचडी डिस्प्लेसह येत असून या स्मार्टफोनमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. या सॅमसंग फ्लिप स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 1.9-इंचाचा दुय्यम डिस्प्ले देखील पाहायला मिळत आहे. कंपनीचा हा सुपर AMOLED डिस्प्ले 260×512 पिक्सेल रिझोल्युशनसह येईल.

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. ऑक्टा-कोअर प्रोसेसरने सुसज्ज असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस असणारे हे दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सलचे असतील. तर वापरकर्त्यांसाठी कंपनी फोनमध्ये 10-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. Galaxy Z Flip 4 मध्ये 3700mAh बॅटरी असून जी एका चार्जवर 34 तासांपर्यंत 4G टॉकटाइम देते. तर कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax 2.4G 5GHz, Bluetooth 5.2, GPS, USB 2.0 आणि USB Type C इअरजॅक दिला आहे.