Samsung Galaxy Z Flip5 : सॅमसंगचे हे शक्तिशाली स्मार्टफोन 27 हजारांनी स्वस्तात येतील खरेदी करता, कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy Z Flip5 : काही दिवसांपूर्वी सॅमसंगने Galaxy Z Flip5 आणि Galaxy Z Fold5 हे दोन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केले होते. ज्यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जे तुम्ही आता कमी किमतीत खरेदी करू शकता.

कंपनीच्या वेबसाइटवर अशी शानदार ऑफर मिळत आहे. ज्याचा तुम्ही लवकरात लवकर लाभ घेतला तर तुमची हजारो रुपयांची बचत होईल. शिवाय तुम्हाला स्वस्तात शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन खरेदी करता येतील. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

कंपनीने असे सांगितले आहे की विशेष ऑफर आणि सवलतींमुळे, Galaxy Z Flip5 आणि Galaxy Z Fold5 दोन्ही स्मार्टफोन्स 85,999 रुपये आणि 138,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येतील. या दोन्ही फोनचे बेस मॉडेल 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतात. ग्राहकांना बँक कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस व्यतिरिक्त EMI पर्यायांसह मोठ्या सवलती देण्यात येतात.

जाणून घ्या Galaxy Z Flip5 किंमत

8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या या वेरिएंटची किंमत 99,999 रुपये ठेवली आहे. तर 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंट 109,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन मिंट, क्रीम, ग्रेफाइट आणि लॅव्हेंडर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. हा फोन 7,000 रुपये बँक कॅशबॅक 7,000 रुपये अपग्रेड आणि 9,000 रुपये अपग्रेड ऑफरसह उपलब्ध आहे.

तसेच अपग्रेड, बँक कॅशबॅक आणि EMI ऑफरसह, या फोनची प्रभावी किंमत 85,999 रुपये असणार आहे. इतकेच नाही तर तो 9 महिन्यांसाठी EMI वर खरेदी करता येणार आहे. बँक कॅशबॅकचा लाभ मिळाला नाही तर या फोनची किंमत 92,999 रुपये असणार आहे. जर ग्राहकांनी फक्त अपग्रेड ऑफरचा लाभ घेतला, तर फोन 90,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीवर खरेदी करता येईल.

जाणून घ्या Galaxy Z Fold5 किंमत

12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 154,999 रुपये ठेवली आहे. तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट 164,999 रुपयांना खरेदी करता येईल. हे फोन तुम्हाला आइस ब्लू, क्रीम आणि फँटम ब्लॅक रंगांमध्ये खरेदी करता येईल.

तसेच 12GB RAM सह 1TB स्टोरेज असणाऱ्या टॉप मॉडेलची किंमत 184,999 रुपये आहे. बँक कॅशबॅक, अपग्रेड आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांनंतर, फोनची किंमत 138,999 रुपये इतकी असेल. 11,000 रुपयांच्या अपग्रेडसह, 7000 रुपयांचा बँक कॅशबॅक आणि 9 महिन्यांपर्यंत EMI, ग्राहकांना 138,999 रुपयांमध्ये Galaxy Z Fold5 खरेदी करता येईल.

जर त्यांनी फक्त अपग्रेड केल्यास तसेच EMI ऑफरचा लाभ घेतला, तर त्यांना 24 महिन्यांपर्यंत EMI पर्याय मिळेल. त्यामुळे या फोनची प्रभावी किंमत 145,999 रुपये असणार आहे. तर तिसरा पर्याय म्हणून, जर ग्राहक बँकेच्या कॅशबॅक किंवा ईएमआय ऑफरचा लाभ मिळाला नाही तर, 11,000 रुपयांच्या अपग्रेडनंतर, फोन 143,999 रुपयांना खरेदी करता येईल.