Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला Samsung Galaxy F15 5G चा नवीन व्हेरिएंट फोन, खरेदीवर मिळेल जबरदस्त ऑफर…

Content Team
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनीने नुकताच आपला एक नवीन बजेट 5G फोन लॉन्च केला आहे. Samsung Galaxy F15 5G कंपनीने या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला होता. त्यावेळी कंपनीने या फोनचे 4GB आणि 6GB रॅम वेरिएंट लॉन्च केले होते. आता ब्रँडने त्याचा 8GB रॅम प्रकार आणला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले सह येतो. यात 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेट Android 14 वर आधारित OneUI वर काम करतो. या फोनची किंमत किती आहे जाणून घेऊया…

Samsung Galaxy F15 5G किंमत

हा सॅमसंग फोन आता तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या नवीन प्रकारात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 15,999 रुपये आहे. तर फोनचा 4GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांच्या किंमतीला लॉन्च करण्यात आला होता आणि 6GB रॅम 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे.

स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. तुम्ही या ऑफर अंतर्गत 1000 रुपये वाचवू शकता. हा हँडसेट तुम्ही दोन रंग पर्यायात खरेदी करू शकता. तुम्ही फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून Galaxy F15 5G खरेदी करू शकता.

Samsung Galaxy F15 5G वैशिष्ट्य

Samsung Galaxy F15 5G मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6100 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.

यात Android 14 वर आधारित OneUI 5.0 आहे. स्मार्टफोन 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 5MP दुय्यम सेन्सर आणि 2MP थर्ड लेन्स आहे. कंपनीने फ्रंटला 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.

तसेच या फोनमध्ये, 6000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.3, GPS आणि USB टाइप-सी कनेक्टिव्हिटीसह येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe