Samsung NeoQLED : रिलायन्सने ग्राहकांसाठी आता एक शानदार सेल आणली आहे. ज्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करून ब्रँडेड प्रोडक्ट खरेदी करू शकाल. त्यामुळे अशी संधी सोडू नका. आजपासून या सेलला सुरुवात झालेली आहे.
तुमच्यासाठी या रिलायन्स सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. इतकेच नाही तर सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफरचा लाभ घेता येईल. स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि अॅपल वॉचवर भरघोस सवलतींसह तुम्ही घरी आणू शकता. तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोअर, माय जिओ स्टोअर आणि रिलायन्स डिजिटल वेबसाइटवर या शानदार सवलतीचा आनंद घेऊ शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर
या वस्तूंवर मिळत आहे भरघोस सवलत
रिलायन्सच्या या शानदार सेलमध्ये तुम्हाला 75 इंचाचा UZD Google TV 69,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. तुम्ही सॅमसंग या कंपनीचा 99,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत NeoQLED टीव्ही खरेदी खरेदी करू शकता. त्याशिवाय या स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर कॅशबॅक देण्यात येत आहे. तर Samsung NeoQLED मॉडेलच्या खरेदीवर 44,990 रुपयांचा मोफत साउंडबार मिळेल.
या सेलमध्ये तुम्हाला फक्त स्मार्ट टीव्ही नाही तर स्मार्टफोन खरेदी करता येतील. तुम्ही शानदार सवलतीत आणि बोनससह Oppo Reno 10 सीरिज खरेदी करू शकता. त्याशिवाय तुम्हाला ब्लूटूथ इयरफोन फक्त 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
कंपनीच्या या सेलमध्ये Apple iPad EMI पर्यायामध्ये 1167 रुपये प्रति महिना खरेदी करता येईल. तसेच एचपी लॅपटॉप एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक ऑफरसह अवघ्या 57,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एकंदरीतच या सवलतींमुळे या लॅपटॉपची किंमत 51,990 रुपये असेल.
त्याशिवाय Apple Airpods Pro 2nd Generation ची किंमत 26,900 रुपये असून जो सवलतींमुळे तुम्हाला 23,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. 45,900 किमतीचे Apple Watch S8 तुम्हाला सेलमधून 33,249 रुपयांना खरेदी करता येईल.