Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Samsung Smart TV Offer : सॅमसंगच्या ‘या’ लोकप्रिय स्मार्ट टीव्हीवर मिळतेय 40% पेक्षा जास्त सवलत, 15 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार

32 इंच स्क्रीन असणाऱ्या सॅमसंगच्या एका लोकप्रिय स्मार्ट टीव्हीवर आता खूप मोठी सवलत दिली जात आहे. परंतु ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी असणार आहे.

Samsung Smart TV Offer : सर्वात लोकप्रिय टेक कंपनी सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हीवर खूप आकर्षक ऑफर देत असून आता तुमची खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. सध्या Amazon वर सॅमसंगच्या एका लोकप्रिय स्मार्ट टीव्हीवर 40% पेक्षा जास्त सवलत मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या ऑफरमुळे तुम्ही हा टीव्ही 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. दरम्यान कंपनीच्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 22,900 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही आता सवलतीत खरेदी करू शकता. दरम्यान काय आहे ऑफर? जाणून घेऊयात.

सध्या Amazon वर खास डील्समुळे स्वस्त दरात सॅमसंग स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर 40% हून अधिक फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध करून दिला आहे आणि तसेच बँकेच्या ऑफरचा स्वतंत्रपणे लाभ घेता येणार आहे. जर तुम्ही Amazon वरून हा टीव्ही खरेदी केला तर कंपनी मोफत इन्स्टॉलेशन देत आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना हवे असेल तर ते टीव्हीची ओपन-बॉक्स-डिलिव्हरी घेऊ शकतात.

मिळत आहे बंपर सवलत

सॅमसंग वंडरटेनमेंट स्मार्ट टीव्ही (UA32T4340BKXXL) ची 32-इंच स्क्रीन आकाराची भारतीय बाजारपेठेत किंमत 22,900 रुपये असून तो आता तुम्ही Amazon वर एका खास डीलसह 41% डिस्काउंटनंतर हा TV Rs 13,490 मध्ये खरेदी करू शकता.

जर तुम्ही HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर पेमेंट केले किंवा EMI व्यवहारांच्या बाबतीत 10% अतिरिक्त सूट सवलत दिली जात आहे. तसेच HSBC बँक डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांच्या बाबतीत 10% सवलत दिली गेली आहे.

जाणून घ्या फीचर्स

फीचर्सबाबत बोलायचे झाले तर कंपनीच्या या टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 32-इंचाचा HD रेडी (1366×768) रिझोल्यूशन डिस्प्ले असून यामध्ये दोन एचडीएमआय पोर्ट, एक यूएसबी पोर्ट, बिल्ट-इन वायफाय आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ पर्याय देण्यात आला आहे.

इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवासाठी, टीव्हीमध्ये 20W एकूण आउटपुट असलेले स्पीकर दिले असून डॉल्बी डिजिटल प्लसला समर्थन देते. इतकेच नाही तर या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक ओटीटी अॅप्स समर्थित आहे. हॉट-कीसह एक स्मार्ट रिमोट दिला आहे.